Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Citroen Car Discount : कार खरेदीची सुवर्णसंधी! Citroen च्या SUV वर मिळतेय 2 लाखांची बंपर सूट, पहा ऑफर

तुम्हालाही नवीन कार खरेदीवर लाखो रुपयांची बचत करण्याची चांगली संधी आहे. कारण Citroen त्यांच्या कार खरेदीवर २ लाख रुपयांची सूट दिली जात आहे.

0

Citroen Car Discount : नवीन कार खरेदीवर तुम्हालाही लाखो रुपयांची बचत करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण Citroen च्या SUVs वर २ लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्यामुळे या महिन्यात कार खरेदीवर तुम्ही लाखोंची बचत करू शकता.

Citroen कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या कारकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी ऑफर देण्यात येत आहे. कारच्या विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी Citroen ने कारवर ऑफर देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Citroen C3 Aircross डिस्काउंट ऑफर काय आहे?

Citroen कार कंपनी त्यांच्या C3 Aircross एसयूव्ही कारवर मोठ डिस्काउंट देत आहे. ही कार खरेदी करून देखील 2 लाखांपर्यंतचे फायदे मिळवू शकता. 31 डिसेंबर 2023 पर्यंत ही ऑफर देण्यात येत आहे. तुम्ही या कालावधीमध्ये कार खरेदी करून पैशांची मोठी बचत करू शकता.

Citroen C3 Aircross वर किती सूट आहे?

Citroen कार कंपनीकडून त्यांच्या C3 Aircross कारवर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या फ्लॅट कॅशबॅक देण्यात येत आहे. 5 वर्षांच्या सर्व्हिसिंग पॅकेजसह 3 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत विस्तारित वॉरंटी देखील देण्यात येत आहे.

Citroen C3 Aircross किंमत आणि व्हेरियंट

तुम्हालाही कमी बजेटमध्ये एसयूव्ही कार खरेदी करून त्यावर आकर्षक सूट मिळवायची असेल तर C3 Aircross एसयूव्ही कार उत्तम पर्याय आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रूपये आहे.

तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.99 लाख रूपये आहे. C3 Aircross कारच्या U व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपये, प्लस व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 11.34 लाख रुपये आणि मॅक्स व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे.

Citroen C3 कारवर देखील सूट उपलब्ध

Citroen कार कंपनीकडून त्यांच्या C3 कारवर देखील या महिन्यात मोठी सूट दिली जात आहे. कारवर 99,000 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच या ऑफरमध्ये इतर ऑफरचा देखील समावेश आहे. या महिन्यात Citroen C3 Aircross आणि C3 कार खरेदी करून मोठी पैशांची बचत करू शकता.