Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Citroen Cars Offer : त्वरा करा! 2 लाख रुपयांनी स्वस्त खरेदी करा सिट्रोएन कार, असा घ्या लाभ

नवीन कार खरेदीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कारण Citroen त्यांच्या शानदार कारवर आकर्षक सूट देत आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही लाखोंची बचत करू शकता.

0

Citroen Cars Offer : फ्रेंच कार उत्पादक कंपनी सिट्रोएनकडून त्यांच्या अनेक कारवर आकर्षक सूट दिली जात आहे. या कार खरेदी करून तुम्ही देखील २ लाख रुपयांपर्यंतची बचत करू शकता. कंपनीकडून रोख सवलत, ग्राहक लॉयल्टी बोनस, विमा लाभ, वित्त, कॉर्पोरेट ऑफर त्यांच्या कारवर देण्यात येत आहे.

तुमचेही नवीन कार खरेदीचे स्वप्न असेल तर ते या महिन्यातच पूर्ण करण्याची संधी आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत सिट्रोएन कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या स्टायलिश कारवर मोठी डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे.

31 डिसेंबर 2023 पर्यंत नवीन कार खरेदी करून तुम्ही २ लाख रुपयांची मोठी बचत करू शकता. Citroen कडून त्यांच्या एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. कमी बजेट ग्राहकांसाठी Citroen च्या कार उत्तम पर्याय आहेत.

Citroen C3 कार डिस्काउंट ऑफर

Citroen कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या C3 कार खरेदीवर देखील या महिन्यात चांगली सूट दिली जात आहे. C3 कार खरेदीवर कंपनीकडून 99,000 रुपयांची सूट दिली जात आहे. कारची एक्स शोरूम किंमत 6.16 लाख रुपये आहे.

तसेच Citroen च्या क्रॉसओवर कारवर देखील 1.5 लाखांपर्यंत ऑफर देण्यात येत आहे. ही कार 5 आणि 7 सीटर पर्यायामध्ये उपलब्ध आहे. कारची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरु होते.

Citroen C5 Aircross डिस्काउंट ऑफर

Citroen कार कंपनीकडून त्यांच्या C5 Aircross एसयूव्ही कारवर सर्वदत मोठी २ लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्यामुळे या महिन्यात C5 Aircross कार खरेदी करून तुम्ही देखील २ लाख रुपयांपर्यत बचत करू शकता. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 36.91 लाख रुपये आहे.

Citroen कंपनीकडून त्यांच्या कारवर देण्यात येत असलेली ऑफर डिलरशिप, रंग पर्याय आणि व्हेरियंटनुसार बदलू शकते. त्यामुळे तुम्ही जवळच्या Citroen डिलरशिपला भेट देऊन कारवरील ऑफर जाणून घेऊ शकता.