Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Citroen eC3 Price Hiked : Tiago, Nexon EV ला टक्कर देणाऱ्या शानदार EV कारच्या किमतीत झाली मोठी वाढ, पहा नवीन किंमत

दिवाळीच्या तोंडावर इलेक्ट्रिक कार खरेदीदारांना मोठा धक्का बसला आहे. कारण Tiago, Nexon EV ला टक्कर देणाऱ्या उत्कृष्ट इलेक्ट्रिक कारच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

0

Citroen eC3 Price Hiked : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या शानदार इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याने अनेकजण इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत.

इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन इलेक्ट्रिक कार भारतात सादर केल्या जात आहेत. इलेक्ट्रिक कार खरेदी करून तुम्ही इंधनावरील पैशांची बचत करू शकता.

Citroen कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या eC3 इलेक्ट्रिक कारच्या सर्व व्हेरियंटच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीकडून त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या किमतीमध्ये 2.97% वाढ केली आहे.

Citroen च्या eC3 इलेक्ट्रिक कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11,50,000 रुपये होती जी आता 11,61,000 रुपये झाली आहे. म्हणजेच कारच्या किमतीमध्ये ११ हजार रुपयांची वाढ झाली आहे. ही कार बाजारात Tiago, Nexon EV ला टक्कर देते.

Citroen eC3 व्हेरियंटनुसार किमती

eC3 इलेक्ट्रिक कारच्या बेस मॉडेल Live व्हेरियंटची अगोदरची एक्स शोरूम किंमत 11,50,000 होती ती आता 11,61,000 रुपये झाली आहे म्हणज या कारच्या किमतीत ११ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

कारच्या Feel व्हेरियंटची अगोदरची एक्स शोरूम किंमत 12,13,000 होती ती आता 12,49,000 रुपये झाली आहे म्हणजेच कारच्या किमतीमध्ये 36 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Feel Vibe Pack व्हेरियंट अगोदरची एक्स शोरूम किंमत 12,28,000 रुपये होती ती आता 12,64,000 रुपये झाली आहे त्यामुळे या व्हेरियंटच्या किमतीमध्ये 36 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

कारच्या टॉप Feel Dual Tone Vibe pack या व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 12,43,000 रुपये होती ती आता 12,79,000 रुपये झाली आहे या व्हेरियंटच्या किमतीमध्ये देखील 36 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Citroen eC3 रेंज आणि बॅटरी पॅक

Citroen कार उत्पादक कंपनीची eC3 इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारमध्ये 29.2kWh चा जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कारची इलेक्ट्रिक मोटर 56bhp पॉवर आणि 143Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 320 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये स्टँडर्ड आणि इको असे दोन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत.