Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

CNG Car Mileage Easy Tips : CNG कारचे मायलेज वाढवण्यासाठी वापरा या टिप्स, होईल आर्थिक फायदा

तुमची सीएनजी कार कमी मायलेज देत असेल तर काही टिप्स फॉलो करून तुम्ही देखील कारचे मायलेज वाढवू शकता. काही टिप्स वापरून सीएनजी कारचे मायलेज सहज वाढवता येऊ शकते.

0

CNG Car Mileage Easy Tips : सीएनजी कार वापरत असताना कारची काळजी घेणे गरजेचे असते. सीएनजी कार पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा सर्वाधिक मायलेज देतात त्यामुळे सीएनजी कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

सीएनजी कार जितक्या फायदेशीर आहेत तितक्या धोकादायक देखील आहेत. सर्वात प्रथम सीएनजी कार बाजारात आल्यानंतर कारला मागणी कमी होती. कारण अनेक ठिकाणी सीएनजी पंप नसल्याने ग्राहक अशा कार खरेदी करणे टाळत होते. मात्र आता बहुतांश ठिकाणी सीएनजी पंप झाल्याने कारच्या मागणीत वाढ झाली आहे.

सीएनजी कार धारकांना कारने सर्वाधिक मायलेज देण्यासाठी हिवाळ्यात अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हालाही तुमच्या सीएनजी कारचे दमदार मायलेज हवे असेल तर काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

हवेच्या दाबाची काळजी घ्या

अनेकदा कार चालवत असताना कारच्या टायरमधील हवेचा दाब तपासाला जात नाही. टायरमध्ये हवा कमी असेल तर त्याचा परिणाम कारच्या मायलेजवर होतो. तुमच्या सीएनजी कारचे उत्कृष्ट मायलेज हवे असेल तर सतत कारच्या टायरमधील हवा तपासावी लागते.

स्पार्क प्लग नियमितपणे तपासा

सीएनजी कारमध्ये स्पार्क प्लग बसवलेले असतात. हे स्पार्क प्लग प्रत्येक कारमध्ये वेगवेगळे असू शकतात. स्पार्क प्लगबद्दल जाणून घेऊन त्याबाबत देखील तपासणी केली पाहिजे. सीएनजी कार 10,000 किलोमीटर धावल्यानंतर स्पार्क प्लग एकदा बदला. असे केल्याने तुमच्या सीएनजी कारचे मायलेज वाढण्यास मदत होईल.

ओव्हर स्पीड टाळा

अनेकदा काहीजण सीएनजी कार चालवत असताना त्याचा वेग अतिशय जास्त ठेवत असतात. अतिशय वेगाने कार चालवणे देखील तुमच्या कारचे मायलेज कमी करू शकते. तुम्ही कंपनी फिटेड सीएनजी किट वापरत नसाल तर सीएनजी कारची काळजी घेणे गरजेचे आहे.

मार्केटमधून बसवलेले सीएनजी किटची गळती तर होत नाही ना हे तपासणे गरजेचे आहे. तुमच्या सियानजीची गळती होत असेल तर तुमची कार कमी मायलेज देऊ शकते. तसेच सीएनजी गळतीमुळे अपघात देखील होण्याची शक्यता असते.