Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

CNG Cars Discount : मारुती ते टोयोटाच्या या CNG कारवर मिळतेय हजारोंची बंपर सूट, असा मिळवा लाभ

0

CNG Cars Discount : नवीन सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण मारुती आणि टोयोटासह कार उत्पादक कंपन्या त्यांच्या सीएनजी कारवर या महिन्यात इयर एंड डिस्काउंट ऑफर देत आहेत.

देशातील अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या कारचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी त्यांच्या कारवर आकर्षक ऑफर देत असतात. त्यामुळे तुम्ही देखील या महिन्यात नवीन सीएनजी कार खरेदी करून तुम्ही हजारोंची बचत करू शकता.

1. मारुती सुझुकी स्विफ्ट CNG डिस्काउंट

मारुती सुझुकी त्यांच्या स्विफ्ट सीएनजी कारवर या महिन्यात इयर एंड ऑफर देत आहे. त्यामुळे तुम्ही ही कार खरेदी करून 25,000 हजार रुपयांची बचत करू शकता. कारवर एक्सचेंज बोनस देण्यात येत नाही. स्विफ्ट कार खरेदी करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे.

2. मारुती सुझुकी Celerio आणि S-Presso CNG डिस्काउंट

मारुती सुझुकी त्यांच्या Celerio आणि S-Presso कारच्या सीएनजी व्हेरियंटवर देखील मोठी ऑफर देत आहे. या कारवर 30,000 रुपयांची रोख सूट आणि 20,000 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे.

3. टाटा Altroz CNG डिस्काउंट

टाटा मोटर्सकडून देखील त्यांच्या सीएनजी कारवर आकर्षक ऑफर देण्यात येत आहे. Altroz CNG कार खरेदीवर तुम्ही 25,000 रुपयांची बचत करू शकता. तसेच 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील देण्यात येत आहे.

4. Hyundai Aura CNG डिस्काउंट

ह्युंदाई मोटर्स त्यांच्या Aura CNG कारवर देखील इयर एंड ऑफर देत आहे. त्यामुळे Aura CNG कार खरेदी करून या महिन्यात तुम्ही 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही Aura CNG कार खरेदीवर हजारोंची बचत करू शकता.

5. टोयोटा Glanza CNG डिस्काउंट

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या सीएनजी कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. टोयोटा Glanza CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तो अगदी योग्य आहे. या महिन्यात Glanza CNG कार खरेदी करून तुम्ही 20,000 रुपयांची रोख सूट आणि 20,000 एक्सचेंज बोनसचा लाभ मिळवू शकता.