Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

CNG Cars In India : पेट्रोल-डिझेलचे झंझट संपले! खरेदी करा जबरदस्त मायलेज देणाऱ्या या सीएनजी कार, किंमतही खूपच कमी

भारतातील ऑटो क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांच्या सीएनजी कार उपलब्ध आहेत. तसेच या सीएनजी कारच्या किमती देखील कमी आहेत तसेच या कार मायलेजच्या बाबतीत देखील सर्वांच्या पुढे आहेत.

0

CNG Cars In India : भारतीय ऑटो बाजारात दिवसेंदिवस सीएनजी कारच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने सीएनजी कारची क्रेझ वाढली आहे. या कार सर्वाधिक मायलेज देत असल्याने ग्राहक देखील त्यांना अधिक पसंती देत आहेत.

ग्राहकांची सीएनजी कारची वाढती मागणी पाहता आता कंपन्यांकडून देखील अनेक सीएनजी कार सादर केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना देखील सीएनजी कार खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा सीएनजी

तुम्हीही सीएनजी कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकी एर्टिगा ही सीएनजी कार सर्वोत्तम पर्याय आहे. ही कार मोठे कुटुंब असणाऱ्यांसाठी एक उत्तम कार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे.

या कारमध्ये कंपनीकडून 1462cc K15B SMART HYBRID इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 5500 rpm वर 87 bhp पॉवर आणि 4200 rpm वर 121.5 Nm टॉर्क जनरेट करते.

मारुती सुझुकी Eeco CNG

तुम्हीही तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी सीएनजी कार शोधत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकी कंपनीची इको कार सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. मारुती सुझुकी Eeco ला 1196cc G12B पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 6000 rpm वर 73 bhp पॉवर आणि 3000 rpm वर 101Nm टॉर्क जनरेट करते.

टाटा टियागो सीएनजी

टाटा मोटर्सकडून देखील त्यांच्या अनेक कार सीएनजी मॉडेलमध्ये सादर केल्या जात आहेत. टाटा मोटर्सची स्वस्तातील आणि कमी बजेटमधील सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार असेल तर टियागो ही कार उत्तम आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1199cc इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 73PS ची पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करते.

मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी

मारुती सुझुकी कंपनीच्या कारची देशामध्ये सर्वाधिक विक्री होत आहे. तसेच या कारमध्ये अनेक फीचर्स कमी बजेटमध्ये दिले जात असल्याने ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद या कारला मिळत आहे. ब्रेझा सीएनजी कार देखील कमी बजेटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

Brezza CNG कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 9.24 लाख रुपये आहे. या कारमध्ये कंपनीकडून 1462 इंजिन देण्यात येत आहे. तसेच ही कार २५.५१ किमी/किलो पर्यंत मायलेज देते.

मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी

मारुती सुझुकी कंपनीची सेलेरियो सीएनजी कार देखील तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.37 लाख रुपये आहे. या कारमध्ये 998CC इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 5300 rpm वर 56 bhp पॉवर आणि 3400 rpm वर 82.1 Nm टॉर्क जनरेट करते.