Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

CNG Cars In India : या आहेत भारतातील जबरदस्त सीएनजी कार! कमी किमतीमध्ये देतात सर्वोत्तम मायलेज

भारतामध्ये अनेक कंपन्यांच्या सीएनजी कार उपलब्ध आहेत. तसेच या सीएनजी कार कमी बजेटमध्ये उपलब्ध असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद या कारला मिळत आहे.

0

CNG Cars In India : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आता अनेकजण सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. सीएनजी कार सर्वाधिक मायलेज देत असल्याने ग्राहकांना त्या परवडणाऱ्या कारपैकी आहेत.

अनेक ग्राहकांनी पूर्वी पेट्रोल कार खरेदी केल्या आहेत. मात्र पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्याने अनेकजण सध्या त्यांच्या कारमध्ये सीएनजी किट बसवत आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांची कार जबरदस्त मायलेज देत आहेत.

पण तुम्ही बाजारातून तुमच्या कारमध्ये सीएनजी किट बसवत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक असू शकते. त्यामुळे तुम्ही नवीन कार खरेदी करताना नेहमी कंपनी फिटेड सीएनजी कार खरेदी करावी.

तुम्हाला अशी सीएनजी कार खरेदी करायची असेल तर थोडी महाग पडू शकते. मात्र तुमच्यासाठी अशी कार सर्वोत्तम आहे. कारण अशा कंपनी फिटेड सीएनजी आकारापासून तुम्हाला कोणताही धोका नसतो.

भारतीय ऑटो बाजारात अशा अनेक सीएनजी कार उपलब्ध आहेत ज्या कंपनी फिटेड येतात. त्यामुळे तुम्ही कंपनी फिटेड सीएनजी किट असलेलीच कार खरेदी करा. खालील कार कंपनी फिटेड सीएनजी किटसह येतात.

1. मारुती वॅगनआर ही तुमच्या बजेटमधील कार आहे. या कारमध्ये कंपनी फिटेड सीएनजी किट येते. त्यामुळे तुमच्यासाठी ही कार सर्वोत्तम आहे.

2. देशातील प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती स्विफ्टला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारमध्ये तुम्हाला कंपनीमध्ये बसवलेले सीएनजी किट मिळते.

3. मारुती अल्टो K10 ही मारुती सुझुकी कंपनीची सर्वोत्तम बजेट कार आहे. या कारमध्ये तुम्हाला कंपनीमध्ये बसवलेले सीएनजी किट पाहायला मिळते.

4. मारुती सुझुकी S-Presso देशांतर्गत बाजारात अधिक लोकप्रिय आहे. या कारमध्ये देखील तुम्हाला कंपनीमध्ये बसवलेले सीएनजी किट पाहायला मिळेल. कमी बजेटमध्ये तुम्ही देखील ही कार खरेदी करू शकता.

5. मारुती सुझुकी बलेनो ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. या कारमध्ये तुम्हाला कंपनीमध्ये बसवलेले सीएनजी किट पाहायला मिळते.

6. Hyundai i10 ला त्याच्या आकर्षक लुक्स आणि अनेक प्रीमियम फीचर्ससाठी पसंती दिली जाते. या कारमध्ये तुम्हाला कंपनीमध्ये बसवलेले सीएनजी किट पाहायला मिळते. कमी बजेट असेल तर तुम्ही देखील ही सीएनजी कार खरेदी करू शकता.

7. Hyundai Aura ही कंपनीची सेडान सेगमेंटची कार आहे. ज्यामध्ये तुम्हाला कंपनीमध्ये बसवलेले सीएनजी किट पाहायला मिळेल.