Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

CNG Cars Under 10 Lakh : सीएनजी कार खरेदी करताय? तर या आहेत १० लाखांच्या आतील सर्वोत्तम CNG कार, पहा यादी

तुम्हीही सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भारतात काही कंपन्यांकडून ग्राहकांना १० लाखांच्या आतमध्ये सीएनजी कार उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

0

CNG Cars Under 10 Lakh : देशात दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलवरील कार चालवणे शक्य होत नाही. त्यामुळे आता नवीन कार खरेदी करताना ग्राहक इलेक्ट्रिक किंवा सीएनजी कारचा पर्याय निवडत आहेत.

तुम्हीही सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करताय आणि तुमचे बजेट कमी आहे तर काळजी करू नका. कारण भारतीय ऑटो बाजारात १० लाखांच्या कमी किमतीमध्ये देखील सीएनजी कार उपलब्ध आहेत. चला तर पाहूया कोणत्या सीएनजी कार १० लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत.

Hyundai Grand i10 Nios

तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्हाला नवीन सीएनजी कार खरेदी करायची असेल तर तुम्ही Hyundai Grand i10 Nios ही सीएनजी कार खरेदी करू शकता. या कारमध्ये कंपनीकडून अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.

Grand i10 Nios या सीएनजी कारमध्ये कंपनीकडून 1.2-लिटर इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 83Ps ची कमाल पॉवर आणि 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. CNG मोडमध्ये, त्याची पॉवर 69BHP पर्यंत कमी होते आणि टॉर्क 96.2Nm पर्यंत जातो. या कारची एक्स शोरूम किंमत 7.16 लाख रुपये आहे.

टाटा टिगोर

टाटा मोटर्सकडून आता सीएनजी कारच्या उत्पादनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएनजी कारच्या मागणीमध्ये वाढ पाहता कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

टाटा मोटर्स इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार निर्मितीकडे अधिक लक्ष देत आहे. तुम्हालाही टाटा कंपनीची सीएनजी कार खरेदी करायची असेल तर टाटा टिगोर ही सर्वोत्तम सीएनजी कार आहे.

या कारमध्ये दोन-सिलेंडर 1.2-लिटर रेवोट्रॉन इंजिन देण्यात येत आहे जे जास्तीत जास्त 86PS पॉवर आणि 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच हेच इंजिन सीएनजी मोडमध्ये 73PS पर्यंत टॉर्क आणि 95Nm टॉर्क जनरेट करते. या कारची एक्स शोरूम किंमत 7.40 लाख रुपये आहे.

ही कार परिपूर्ण फीचर्ससह भारतीय बाजारपेठेत ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुश बटण स्टार्ट, क्रूझ कंट्रोल, ऑटो टेंपरेचर कंट्रोल, इलेक्ट्रिक ओआरव्हीएम, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, रीअर वायपर आणि वॉशर, इलेक्ट्रिक टेलगेट रिलीझ, फॉलो-मी होम लाईट्स, पंक्चर रिपेअर किट, टचस्क्रीन गेट्स इन्फोटेनमेंट सिस्टम अशी अनेक वैशिष्ट्ये या कारमध्ये देण्यात आली आहेत.

मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीकडून ग्राहकांना सर्वात स्वस्त आणि दमदार मायलेज देणाऱ्या कार उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

मारुती सुझुकी कंपनीकडून स्विफ्ट कार सीएनजी मॉडेलमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कारमध्ये कंपनीकडून 4 सिलिंडरसह 1.2 लीटर इंजिन देण्यात आले आहे जे 77PS ची पॉवर आणि 98.5Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच ही कार 31 kmpl मायलेज देते.

या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, हिल स्टार्ट असिस्ट, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, फॉग लॅम्प्स, सात-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम अशी अनेक दमदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 7.8 लाख रुपये आहे.