Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 8 lakh CNG Cars : 5 लाखात 31.59 Kmpl मायलेज! कमी बजेटमध्ये खरेदी करा प्रीमियम फीचर्स सीएनजी कार…

सीएनजी कार खरेदी करायची आहे? तर देशातील ऑटो बाजारात ह्युंदाईपासून मारुती सुझुकीपर्यंतच्या अनेक सीएनजी कार उपलब्ध आहेत.

0

Under 8 lakh CNG Cars : देशात पेट्रोल आणि डिझीएलच्या किमती गगनाला बदल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना पेट्रोल आणि डिझेलवरील कार चालवणे न परवडण्यासारखे झाले आहे. त्यामुळे अनेकजण सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत.

तुम्हालाही कमी बजेटमध्ये शानदार सीएनजी कार खरेदी करायची असेल तर ऑटो मार्केटमध्ये अनेक सीएनजी कार उपलब्ध आहेत. या कारच्या किमती देखील खूपच कमी आहेत. ८ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही या कार खरेदी करू शकता.

मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी

मारुती सुझुकी सेलेरियो कार देखील कमी बजेटमध्ये चांगला पर्याय आहे. सेलेरियो कारमध्ये सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. ही कार सीएनजी मोडमध्ये 31.79 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे.

कारमध्ये कंपनीकडून 998 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 58.3 BHP पॉवर तयार करते. कारमध्ये एअरबॅग, एबीएस आणि रियर पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 6.72 लाख रुपयांपासून सुरू होते.

मारुती सुझुकी अल्टो 800 CNG

मारुती सुझुकीच्या अल्टो 800 कारमध्ये देखील सीएनजी पर्याय ऑफर करण्यात आला आहे. अल्टो 800 ही सीएनजी कार 31.59 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारमध्ये 796 सीसी इंजिन देण्यात आले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.13 लाख रुपये आहे. कारमध्ये साइड एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आले आहे.

ह्युंदाई सँट्रो सीएनजी

ह्युंदाई मोटर्सच्या सँट्रो कारमध्ये देखील सीएनजी पर्याय ऑफर करण्यात आला आहे. ही कार सीएनजी पर्यायांमध्ये 30.48 Kmpl मायलेज देते. या कारची एक्स शोरूम किंमत 5.87 लाख रुपये आहे. कारमध्ये 1086 सीसी इंजिन देण्यात आले आहे. तसेच एअरबॅग्ज, एबीएस आणि रिअर पार्किंग सेन्सर असे फीचर्स देखील दिले आहेत.

मारुती सुझुकी वॅगन आर सीएनजी

मारुती सुझुकीची वॅगन आर कार ही सर्वात लोकप्रिय सीएनजी कार आहे. या कारमध्ये अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये 998 सीसी इंजिन देण्यात आले आहे जे 32.52 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 6.43 लाख रुपये आहे. सुरक्षेसाठी यात एअरबॅग, एबीएस आणि रियर पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत.