Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

CNG Vehicle : CNG भरताना कारमधून खाली का उतरावे लागते? जाणून घ्या यामागील कारणे

सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले असता तुम्हाला कारमधून खाली उतरवले जाते. मात्र तुम्ही कधी यामधील कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? यामागे अनेक कारणे आहेत जी तुम्हाला देखील माहिती असणे गरजेचे आहे.

0

CNG Vehicle : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेकजण आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी कारचा पर्याय निवडत आहेत. सीएनजी कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अनेकजण कंपनी फिटेड सीएनजी कार खरेदी करतात तर काहीजण मार्केटमधून सीएनजी किट बसवून घेत असतात.

सीएनजी कार पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत अधिक मायलेज देतात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सीएनजी कार वापरणे खिशाला परवडणारे आहे. तसेच सीएनजी किंमत देखील कमी असल्याने अनेकजण सीएनजी कारचा पर्याय निवडतात. सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस.

मात्र सीएनजी कार वापरणे जितके फायदेशीर आहे तितकेच धोक्याचे देखील आहे. मार्केटमधून सीएनजी किट बसवल्यानंतर अनेक समस्या निर्माण होत असतात. तसेच कंपनी फिटेड सीएनजी किटमध्ये देखील समस्या पाहायला मिळतात.

सीएनजी कारचा अनेकदा स्फोट किंवा कार पेटल्याचे तुम्ही ऐकले असेल. सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेल्यानंतर तुम्हाला कारच्या खाली उतरण्यास सांगितले जाते. यामागचे कारण कधी तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर चला जाणून घेऊया.

अपघात होण्याची भीती

सीएनजी कार अनेकदा पेटल्याचे किंवा स्फोट झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. सीएनजी कारला अपघात होण्याचा मोठा धोका असतो. कारण यामध्ये गॅस गळती होऊन कार पेटण्याची किंवा स्फोट होण्याची भीती असल्याने सीएनजी भरताना कारमधून खाली उतरवले जाते.

मीटर निरीक्षण

तसेच पेट्रोल पंपावर अनेकांची फसवणूक केली जाते. कारमध्ये बसून जर तुम्ही सीएनजी भरत असाल तर तुमचीही फसवणूक केली जाऊ शकते. पेट्रोल आणि सीएनजीचे मीटर वेगवेगळे असतात. त्यामुळे कारच्या खाली उतरून मीटर्सचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. मीटर सुरु होण्याअगोदर शून्य पाहणे गरजेचे आहे.

सीएनजी गॅसच्या वासामुळे प्रवाशांना त्रास

सीएनजी गॅसच्या वासामुळे अनेकदा प्रवाशांना त्रास होत असतो. कारमध्ये सीएनजी लीक असेल तर प्रवाशांना डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येऊ शकते. त्यामुळे कधीही सीएनजी भरत असताना कारमधून बाहेर पडणे फायदेशीर ठरू शकते.

कारमध्ये सीएनजी भरत असताना पंपावर तुम्हाला खाली उतरण्यास सांगितले नाही तरीही तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी कारमधून खाली उतरा. कारमधून खाली उतरणे तुमच्यासाठी कधीही फायदेशीर ठरू शकते.