Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Compact SUV In India : क्रेटा की ग्रँड विटारा? कोणती कार आहे सर्वात स्वस्त, खरेदी करण्यापूर्वी समजून घ्या फरक

कार खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या कारमधील किमतीतील फरक समजून घेणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते.

0

Compact SUV In India : बाजारात एकापेक्षा एक अशा जबरदस्त कार्स लाँच होत आहेत. ज्या तुम्ही सहज खरेदी करू शकतात. परंतु त्यांच्या किमतीत आणि फीचर्समध्ये खूप फरक असतो. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी हा फरक समजून घ्या नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल.

या आहेत सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही

या कारच्या समोर किया सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा, ह्युंदाई क्रेटा, स्कोडा कुशाक, टोयोटा हेरायडर, व्हीडब्ल्यू तैगुन आणि एमजी एस्टर सारखी लोकप्रिय कार मॉडेल्स आहेत. त्यापैकीच सेल्टोस, क्रेटा आणि ग्रँड विटारा या भारतीय बाजारातील सर्वात जास्त लोकप्रिय एसयूव्ही आहेत.

खरतर बाजारामध्ये या कारची विक्री चांगली आहे. किमतीचा विचार केला तर Grand Vitara, Creta, Seltos आणि Elevate च्या किमतीवर नजर टाकायची झाली तर त्या जवळपास सारख्याच आहेत पण थोडा फरक तुम्हाला जाणवू शकतो.

जाणून घ्या किमतीतील फरक

या कारच्या किमतीचा विचार केला तर Honda Elevate ची किंमत 11 लाख ते 16 लाख रुपयांपर्यंत असून Hyundai Creta ची किंमत 10.87 लाख ते 19.20 लाख रुपये इतकी आहे. त्याशिवाय बाजारात असणाऱ्या मारुती ग्रँड विटाराची किंमत 10.70 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच Kia Seltos ची किंमत 10.90 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत आहे. हे लक्षात घ्या की सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वांमध्ये सर्वात कमी प्रारंभिक किंमत ग्रँड विटाराची आहे.

या आहेत टॉप 5 SUV

यापैकी एलिव्हेटची विक्री अजूनही सुरू झाली नसून क्रेटा आणि ग्रँड विटारा या ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या टॉप-5 एसयूव्हींमध्ये होत्या. तर ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात जास्त विकल्या गेलेल्या 5 SUV मध्ये मारुती ब्रेझा (14,572 युनिट्स), टाटा पंच (14,523 युनिट्स), ह्युंदाई क्रेटा (13,832 युनिट्स), मारुती फ्रॉन्क्स (12,164 युनिट्स) आणि मारुती ग्रँड विटारा (11,818 युनिट्स) या कार्स होत्या.