Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Compact SUV Tips : कॉम्पॅक्ट SUV खरेदीपूर्वी एका क्लिकवर पहा फायदे आणि तोटे

0

Compact SUV Tips : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. अशा काळात अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर करत आहेत. नवनवीन एसयूव्ही कार खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल पाहायला मिळत आहे.

अनेक कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार लाँच करण्याची योजना आखली आहे. अनेक ग्राहकांच्या मनात आजही एसयूव्ही कार खरेदी करण्यावर संभ्रम आहे. तुम्हालाही एसयूव्ही कार खरेदी करणे फायद्याचे की तोट्याचे आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता.

तुम्ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही का खरेदी करावी?

नवीन कार खरेदीपूर्वी अनेकजण गोंधळात असतात. नसून कार खरेदी करण्यापूर्वी ग्राहक अनेक कंपन्यांच्या कारविषयी माहिती घेत असतात. एसयूव्ही कार कधीही इतर कारच्या तुलनेत आकर्षक दिसत असतात.

एसयूव्ही कारमध्ये काही फीचर्स कमी प्रमाणात ऑफर केले जातात मात्र ग्राहकांच्या सोयीचा विचार केला तर एसयूव्ही कार इतर कारच्या तुलनेत सर्वोत्तम मानले जात आहे. सेडान कारच्या तुलनेत एसयूव्ही कारमध्ये प्रवाशांना बसण्याची क्षमता देखील जास्त असते.

सेडान कारपेक्षा या कारचा आकार देखील मोठा असतो. कोणत्याही रस्त्यावर एसयूव्ही कार सहज प्रवास करू शकतात. तसेच सेडान कार खडबडीत रस्त्यावरून प्रवास करू शकत नाहीत. मात्र एसयूव्ही कार कमी रुंदीच्या रस्त्यावर सहज प्रवास करू शकत नाहीत.

पॉवरच्या बाबतीत कोण सर्वोत्तम

सध्या एसयूव्ही कार खरेदी करण्याचा ग्राहकांचा मोठा कल आहे. या एसयूव्ही कार सहज ऑफ-रोडिंग किंवा खडबडीत रस्त्यावर चालू शकतात. तसे इतर सेडान आणि हॅचबॅक कार अशा रस्त्यावरून चालू शकत नाहीत.

सेडान किंवा हॅचबॅक कारच्या तुलनेत एसयूव्ही कारचे इंजिन अधिक शक्तिशाली असते. त्यामुळे अशा कार तुमच्यासाठी फायद्यची ठरू शकते.

सर्वोत्तम कॉम्पॅक्ट एसयूव्ही

तुम्हालाही कमी बजेटमध्ये सर्वोत्तम कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर बाजारात Tata Nexon, Maruti Suzuki Brezza, Kia Seltos आणि Hyundai Creta सारख्या कार उपलब्ध आहेत. या कार तुमच्या फॅमिलीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.