Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Compact Suv Under 10 Lakhs : Nexon, Fronx, Kiger आणि Magnite कोणती आहे बेस्ट SUV, पहा किंमत

तुम्हीही कमी किमतीमध्ये शानदार एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत.

0

Compact Suv Under 10 Lakhs : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या एकापेक्षा एक दमदार SUV कार सादर करण्यात आल्या आहेत. एसयूव्ही कारच्या मागणीत वाढ होत असल्याने अनेक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार लॉन्च केल्या जात आहेत.

टाटा मोटर्सकडून अलीकडेच त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कार Nexon फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. तर कारच्या डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

तुम्हीही नवीन कार खरेदी करणार असाल आणि तुम्ही टाटा Nexon, मारुती Fronx, रेनॉल्ट Kiger आणि निसान मॅग्नाइट या एसयूव्ही कार निवडल्या असतील तर तुम्हाला त्याआधी कोणत्या कारमध्ये सर्वाधिक फीचर्स मिळतात, तसेच कारच्या किमती देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

डाइमेंशन, किंमत आणि इंजिन

टाटा Nexon फेसलिफ्ट

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Nexon फेसलिफ्ट कारमध्ये अनेक बदल केले आहेत. कारची लांबी 3995 मिमी, रुंदी 1804 मिमी, उंची 1620 मिमी देण्यात आली आहे. तर कारमध्ये 2498 मिमी व्हीलबेस आणि 208 मिमी ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. Nexon कारमध्ये 382 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे.

Nexon फेसलिफ्ट कारमध्ये 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5-लीटर 4-सिलेंडर डिझेल इंजिन पर्याय देण्यात आला आहे. पेट्रोल इंजिनमध्ये 5MT, 6MT, 6AMT आणि 7DCT ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपये ते 13.50 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी Fronx

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. त्यांच्या Fronx एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कारला लांबी 3995 मिमी, रुंदी 1765 मिमी, उंची 1550 मिमी देण्यात आली आहे. तसेच कारमध्ये 2520 मिमी व्हीलबेस आणि 190 मिमी ग्राउंड क्लिअरन्स देखील देण्यात आला आहे. कारमध्ये 308 लिटर बूट स्पेस उपलब्ध आहे.

कारमध्ये 1.2 L 4-सिलेंडर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच कारमध्ये सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे. तसेच कारमध्ये 1.0L 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय देखील देण्यात आला आहे. Fronx कारची एक्स शोरूम किंमत 7.46 लाख रुपये ते 13.13 लाख रुपये आहे.

रेनॉल्ट Kiger

रेनॉल्ट कार कंपनीची Kiger एसयूव्ही कार देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारमध्ये 405 लिटरची मोठी बूट स्पेस देण्यात आली आहे. तसेच 205 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि 2500 मिमी व्हीलबेस देण्यात आला आहे. कारची लांबी 3991 मिमी, रुंदी 1750 मिमी, उंची 1605 मिमी आहे.

Kiger कारमध्ये 1.0L 3-सिलेंडर NA पेट्रोल आणि 1.0L 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. कारमध्ये 5MT, 5AMT आणि CVT ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात येत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.50 लाख रुपये ते 11.23 लाख रुपये आहे.

निसान मॅग्नाइट

निसान मॅग्नाइट ही एक सर्वोत्तम एसयूव्ही कार आहे. कारमध्ये 205 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि 336 लिटर बूट स्पेस देण्यात आली आहे. कारची लांबी 3995 मिमी, रुंदी 1758 मिमी, उंची 1572 मिमी देण्यात आली आहे.

या एसयूव्ही कारमध्ये 1.0L 3-सिलेंडर NA पेट्रोल आणि 1.0L 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6 लाख ते 11.02 लाख रुपये आहे.