Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Creta Facelift 2024 : Nexon ची अडचण वाढणार! ह्युंदाई लॉन्च करणार शक्तिशाली SUV, देणार 25 Kmpl पेक्षा जास्त मायलेज

ह्युंदाई मोटर्सकडून Nexon ला टक्कर देण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. ह्युंदाई मोटर्स त्यांची नवीन एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे.

0

Creta Facelift 2024 : नवीन कार खरेदी करताना अनेकजण एसयूव्ही कारचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे एसयूव्ही कारच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता अनेक कंपन्या त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर करत आहेत.

अलीकडेच टाटा मोटर्सने त्यांच्या दमदार एसयूव्ही कार सादर केल्या आहेत. यामध्ये Nexon फेसलिफ्ट एसयूव्हीचा देखील समावेश आहे. Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. या कारला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार रेटिंग देखील मिळाले आहे.

ह्युंदाई मोटर्स Nexon एसयूव्हीला टक्कर देण्यासाठी सज्ज २०२४ मध्ये ह्युंदाई मोटर्स त्यांच्या नवीन शक्तिशाली एसयूव्ही कार सादर करणार आहे. ह्युंदाई मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही क्रेटाचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. ही कार Nexon शी स्पर्धा करेल.

क्रेटा एसयूव्ही कारच्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये अनेक नवीन बदल पाहायला मिळतील. कारच्या केबिनमध्ये कॉस्मेटिक बदल केले जाणार आहेत. कंपनीकडून इंजिनमध्ये देखील मोठा बदल केला जाऊ शकतो. नवीन क्रेटा एसयूव्ही कारमध्ये हायब्रिड इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे.

क्रेटा फेसलिफ्टला मिळणार नवीन डिझाइन

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारला नवीन डिझाईन मिळण्याची शक्यता आहे. ही कार चाचणी दरम्यान दिसून आली आहे. कारमध्ये नवीन ड्युअल टोन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. तसेच एलईडी हेडलॅम्प, डीआरएल आणि फ्रंट ग्रिलच्या डिझाईनमध्ये देखील बदल पाहायला मिळेल. फ्रंट बंपर आणि रियर प्रोफाइलमध्येही बदल दिसू शकतात.

क्रेटा फेसलिफ्टच्या केबिनमध्ये प्रीमियम फीचर्स

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्या केबिनमध्ये अनेक बदल केले जाण्याची शक्यता आहे. कारमध्ये ADAS आणि 360 डिग्री कॅमेरा सारख्या नवीन वैशिष्ट्यांची भर पडू शकते. तसेच पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम अशी वैशिष्ट्ये देखील दिली जाऊ शकतात.

क्रेटामध्ये नवीन इंजिन पर्याय

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.5 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन कारमध्ये देण्यात येईल. तसेच कारमध्ये क्रेटामध्ये नवीन हायब्रिड इंजिन देखील दिले जाईल. कारचे हायब्रीड इंजिन २५ Kmpl मायलेज देण्यास सक्षम असेल. मात्र कंपनीने कारच्या हायब्रीड इंजिनबाबत काहीही खुलासा केला नाही.