Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Creta Facelift 2024 : मोठ्या बदलांसह लॉन्च होणार क्रेटाचे फेसलिफ्ट मॉडेल ! नवीन इंजिनसह मिळणार ही प्रीमियम वैशिष्ट्ये

0

Creta Facelift 2024 : ह्युंदाई मोटर्सकडून 2024 मध्ये त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर केल्या जाणार आहेत. आता ह्युंदाईकडून क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार मोठ्या बदलांसह पुन्हा एकदा लॉन्च केली जाणार आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून 16 जानेवारी 2024 रोजी जागतिक बाजारपेठेत क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार कॉस्मेटिक अपडेट्ससह सादर केली जाणार आहे. ही कार चाचणी दरम्यान अनेकदा दिसून आली आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून 16 जानेवारी 2024 रोजी जागतिक बाजारपेठेत सर्वात प्रथम क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे. कारच्या डिझाईन आणि फीचर्समध्ये मोठे बदल केले जाणार आहेत.

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये नवीन ड्युअल-टोन डायमंड-कट अलॉय व्हील हे हायलाइट्स दिले आहेत. तसेच कारला कनेक्टेड टेल लॅम्प सेटअप देखील दिला जाईल. अपफ्रंट, नवीन एलईडी हेडलॅम्प आणि डीआरएल, अपडेटेड बंपर आणि नवीन फ्रंट ग्रिलसह क्रेटा फेसलिफ्टमध्ये अनके बदल केले जाणार आहेत.

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये लेव्हल 2 ADAS, एक 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, एक संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एक नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एक इन-बिल्ट डॅशकॅम यासह अनेक फीचर्स दिले जाणार आहेत.

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये नवीन इंजिन पर्याय दिला जाणार आहे. कारमध्ये 1.4-लिटर tGDi पेट्रोल इंजिन वापरले आले होते आता ते बंद करण्यात आले आहे. आता कारमध्ये 1.5-लीटर tGDi पेट्रोल इंजिन दिले जाईल जे इंजिन 7-स्पीड DCT गिअरबॉक्सशी जोडलेले असेल.

तसेच हे इंजिन 160 bhp आणि 253 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. सध्या क्रेटा कारमध्ये देण्यात येणारे 1.5 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेट केलेले पेट्रोल आणि 1.5 लीटर CRDi डिझेल हे दोन्ही इंजिन कायम ठेवले जातील.