Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Creta Facelift 2024 : क्रेटा फेसलिफ्ट प्रीमियम फीचर्ससह होणार लॉन्च ! असणार इतकी किंमत, एका क्लिकवर पहा सर्वकाही

0

Creta Facelift 2024 : ह्युंदाई मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही कार क्रेटा आता नवीन अवतारात पुन्हा एकदा लॉन्च होणार आहे. ह्युंदाई मोटर्स जानेवारी 2024 या महिन्यातच क्रेटा फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. कंपनीकडून कारचे बुकिंग देखील सुरु करण्यात आले आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या क्रेटा फेसलिफ्ट कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. तुम्हालाही ह्युंदाई मोटर्सची क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही 25,000 रुपयांची टोकन रक्कम भरून बुक करू शकता.

ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारचे अनावरण देखील केले आहे. ह्युंदाई कार कंपनी त्यांची क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार सात व्हेरियंटमध्ये लॉन्च करणार आहे.

E, EX, S, S(O), SX, SX Tech आणि SX(O) अशा व्हेरियंटमध्ये क्रेटा फेसलिफ्ट लॉन्च केली जाईल. लॉन्च होण्याआधीच ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट डिलरशिपवर पोहचू लागली आहे.

ह्युंदाई मोटर्स क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये रॉबस्ट एमराल्ड पर्ल, फायरी रेड, रेंजर खाकी, अॅबिस ब्लॅक, अॅटलस व्हाईट, टायटन ग्रे आणि ब्लॅक रूफ शेड्स असलेले टू-टोन अॅटलस व्हाईट असे रंग पर्याय देऊ शकते.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टमध्ये काय झाले बदल?

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये अनके मोठे बदल करण्यात आले आहेत. फॅसिआमध्ये नवीन ग्रिल सेक्शन आणि हेडलॅम्प, नवीन एलईडी डीआरएल देण्यात आले आहे.

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. तसेच नवीन मागील बंपर, एक इंटिग्रेटेड स्पॉयलर, क्रोम डोअर हँडल्स दिले आहेत.

क्रेटा फेसलिफ्ट वैशिष्ट्ये

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड-स्पॉट व्ह्यू मॉनिटर, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्युअल स्क्रीन लेआउटसह लेव्हल 2 ADAS टेक, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25-इंच डिजिटल कन्सोल अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

तसेच कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ, आठ-वे पॉवर ड्रायव्हर सीट, हवेशीर फ्रंट सीट्स, आठ-स्पीकर बोस ऑडिओ, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, चारही चाकांवर डिस्क ब्रेक आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण अशी अनके फीचर्स देण्यात आले आहेत.

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय नव्याने देण्यात आला आहे. हे इंजिन 160 PS ची पॉवर आणि 253 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. कारची एक्स शोरूम किंमत 11.5 लाख रुपये ते 21.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते.