Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Creta Facelift SUV : मोठ्या बदलांसह क्रेटा फेसलिफ्ट या दिवशी भारतात होणार लॉन्च ! पहा नवीन डिझाईन आणि वैशिष्ट्ये

0

Creta Facelift SUV : ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही कार क्रेटाचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लॉन्च केले जाणार आहे. या कारमध्ये डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक मोठे बदल केले जाणार आहेत. लवकरच क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार भारतात लॉन्च केली जाणार आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून 16 जानेवारी 2024 त्यांची क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार भारतात लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाल्याने ह्युंदाई मोटर्स त्यांच्या नवीन एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. कारला आणखी आकर्षक लूक देण्यासाठी कंपनीकडून डिझाईनमध्ये देखील मोठा बदल केले आहे.

क्रेटा फेसलिफ्ट बाहेरील डिझाईन

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारचे डिझाईन चाचणी दरम्यान समोर आले आहे त्यामुळे कार बाहेरून कशी दिसणार हे देखील स्पष्ट झाले आहे.

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये एलईडी हेडलाइट सेटअप, एक मोठा रेडिएटर ग्रिल आणि नवीन एलईडी टेल लाइट दिला जाऊ शकतो. तसेच फ्रंट-एंडला पॅरामेट्रिक ज्वेल ग्रिल डिझाइन दिले जाऊ शकते. कारचे आलीय व्हील्स देखील अधिक आकर्षक असतील.

क्रेटा फेसलिफ्ट इंटेरियर केबिन

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या i20 कारच्या केबिनमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. कारच्या केबिनमध्ये ग्राहकांना आणखी प्रीमियम फीचर्स दिले जातील.

केबिनमध्ये नवीन रंग पर्याय देखील पाहायला मिळू शकतो. क्रेटा फेसलिफ्ट नवीन सर्व-डिजिटल 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट दिली जाईल.

क्रेटा फेसलिफ्ट इंजिन

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.5-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन 113 hp कमाल पॉवर आणि 144 Nm पीक टॉर्क जनरेट करते तर क्रेटा फेसलिफ्ट कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले जाईल जे 114 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करेल. तसेच क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देखील दिले जाईल.