Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Creta Facelift बुक केल्यानंतर मिळणार तब्बल इतक्या महिन्यांनी, पहा किंमत आणि फीचर्स

0

Creta Facelift : ह्युंदाई मोटर्सकडून अलीकडेच त्यांची क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार लाँच केली आहे. या कारमध्ये अनके बदल करण्यात आले आहेत. डिझाईनपासून काही कॉस्मेटिक बदल क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये पाहायला मिळत आहेत.

तुम्हीही तुमच्यासाठी नवीन क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारचे बुकिंग सुरु करून कारची डिलिव्हरी देखील ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे.

ह्युंदाई मोटर्सची नवीन क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार खरेदी करणार असाल तर त्याआधी तुम्हाला कारवरील प्रतीक्षा कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे. क्रेटा फेसलिफ्ट बुक केल्यानंतर किती दिवसांत तुम्हाला कारची डिलिव्हरी मिळेल ते जाणून घेऊया.

क्रेटा फेसलिफ्ट प्रतीक्षा कालावधी किती आहे?

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि आकर्षक डिझाईन देण्यात आले आहे. कारची डिलिव्हरी गेल्या दहा दिवसांपासून देण्यास सुरुवात केली आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारला बाजारात प्रचंड मागणी आहे.

कारच्या डिझेल व्हेरियंटला बाजारात चांगली मागणी आहे. क्रेटाचे डिझेल व्हेरियंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. क्रेटा एसयूव्ही कारचे पेट्रोल व्हेरियंट खरेदी करण्यासाठी 3 ते 4 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट इंजिन

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात आले आहे. कारच्या इंजिनमध्ये हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्ससह देण्यात आले आहेत.

क्रेटा फेसलिफ्ट व्हेरियंट आणि किंमत

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये एकूण सात व्हेरियंट सादर करण्यात आली आहेत. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20.15 लाख रुपये आहे. E, EX, S, S (O), SX, SX Tech आणि SX (O) अशा सात व्हेरियंटमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे.

क्रेटा फेसलिफ्ट वैशिष्ट्ये

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये इंफोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी दोन 10.25-इंच स्क्रीन, अपडेटेड सीट अपहोल्स्ट्री, 360 डिग्री सराउंड कॅमेरा, 6 एअरबॅग्ज, सर्व सीटसाठी 3 पॉइंट सीट बेल्ट, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, VSM सह ESC, हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल असे फीचर्स देण्यात आले आहेत.