Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Creta Facelift : ह्युंदाई Creta फेसलिफ्ट या महिन्यात होणार लॉन्च! नवीन इंजिनसह होणार मोठे बदल

ह्युंदाईची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही क्रेटा कार लवकरच नवीन रूपात ऑटो मार्केटमध्ये दाखल होणार आहे. तसेच कारमध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत.

0

Creta Facelift : ह्युंदाई मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही Creta कार लवकरच नवीन अपडेटेड व्हर्जनमध्ये भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता क्रेटा कारचे नवीन मॉडेल खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारमध्ये अनेक मोठे बदल केले जाणार आहेत.

ह्युंदाई कार उत्पादक कंपनीकडून क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्टचे उत्पादन जानेवारी २०२४ मध्ये सुरु केले जाऊ शकते. ही नवीन कार चेन्नई प्लांटमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट कारचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

कधी होणार लॉन्च?

ह्युंदाई कंपनीकडून क्रेटा कारचे नवीन मॉडेलचे उत्पादन २०२४ जानेवारी मध्ये सुरु केले जाऊ शकते आणि क्रेटा फॅसिलिफ्ट कार फेब्रुवारी 2024 च्या अखेरीस बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. कारची काही वैशिष्ट्ये देखील लीक झाली आहेत.

वैशिष्ट्ये

ह्युंदाई मोटर्सकडून क्रेटा फॅसिलिफ्ट कारमध्ये Advanced Driver Assistance System (ADAS) हे सुरक्षा फीचर्स दिले जाऊ शकते. कारमध्ये स्टॉप-अँड-गो तंत्रज्ञान, लेन-कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर अलर्ट, समोरच्या टक्कर अलर्ट, लेन फॉलोइंग असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट कोलिजन मिटिगेशन असिस्ट, रिअर क्रॉस-ट्राफिक कोलिजन सहाय्य अशी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात.

360-डिग्री कॅमेरा, Hyundai च्या BlueLink कनेक्टेड कार तंत्रज्ञानामध्ये अतिरिक्त वैशिष्ट्यांसह कार लॉन्च केली जाऊ शकते. तसेच कारमध्ये नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि हाय-डेफिनिशन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील दिले जाऊ शकते.

डिझाईन

ह्युंदाई क्रेटा कारच्या डिझाईनमध्ये देखील बदल केला जाऊ शकतो. जागतिक बाजारपेठेत उपस्थित असलेल्या Palisade SUV कारसारखे ह्युंदाई क्रेटा कारचे डिझाईन असू शकते. हेडलॅम्पमध्ये पॅलिसेड एलईडी डीआरएलसह स्प्लिट सेटअप देण्यात येऊ शकतो.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट इंजिन

ह्युंदाईकडून क्रेटा फॅसिलिफ्ट कारमध्ये Verna कारसारखे 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाण्याची अपेक्षा आहे. हे इंजिन 160bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच कंपनीकडून सध्या क्रेटा कारमध्ये असलेले पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन कायम ठेवले जाईल. नवीन क्रेटा कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह बाजारात उपलब्ध असेल.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट कार लॉन्च होताच किआ सेल्टोस, होंडा एलिव्हेट आणि मारुती ग्रँड विटारा या जबरदस्त एसयूव्ही कारशी स्पर्धा करेल. 2025 च्या सुरुवातीला ह्युंदाई क्रेटा कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन ऑटो बाजारात लॉन्च केले जाऊ शकते.