Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Cruise Control Cars : आता लांबचा प्रवास होईल आरामात! क्रूझ कंट्रोल फीचरने सुसज्ज आहेत या स्टायलिश कार, किंमत 7 लाखांपासून सुरू

तुम्हालाही सतत लांब प्रवास करावा लागत असेल तर तुमच्यासाठी बाजारात क्रूझ कंट्रोल फीचरने सुसज्ज असलेल्या अनेक कार उपलब्ध आहेत. या कार खरेदी करून तुम्ही आरामात प्रवास करू शकता.

0

Cruise Control Cars : आजकाल ऑटो बाजारात एकापेक्षा एक दमदार कार उपलब्ध होत आहेत. तसेच आता नवीन कार प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तसेच ग्राहकांची मागणी देखील सुसज्ज फीचर्स असलेल्या कारला अधिक आहे.

लांब प्रवास करायचा असेल आणि जर तुमच्या कारमध्ये क्रूझ कंट्रोल सिस्टीम असेल तर तुम्ही कितीही लांब प्रवास अगदी आरामात करू शकता. जर तुम्ही क्रूझ कंट्रोल सिस्टीम असलेली कार हायवेवर ताशी 60 किलोमीटर वेगाने धावत असेल तर तुम्ही त्याचे स्पीड सेट करू शकता.

त्यामुळे कार चालवण्यासाठी चालकाला एक्सलेटरवर पाय ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे क्रूझ कंट्रोल सिस्टीमचा चालकाला मोठा फायदा होत असतो. चालकाला सतत वेग वाढवणे आणि कमी करण्याचा त्रास होणार नाही. तुम्हीही अशी क्रूझ कंट्रोल सिस्टीम असलेली कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खालील कार ऑटो बाजारात उपलब्ध आहेत.

Hyundai Grand i10 NIOS

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या अनेक नवीन कारमध्ये क्रूझ कंट्रोल फीचर देण्यात आले आहे. त्यांची Grand i10 NIOS ही कार देखील क्रूझ कंट्रोल फीचरने सुसज्ज आहे. या कारच्या Sportz व्हेरियंटमध्ये हे फीचर्स देण्यात आले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 7.21 लाख रुपये आहे.

टाटा पंच

टाटा मोटर्सकडून त्यांच्या कारमध्ये अनेक मानक सूक्ष फीचर्स आणि इतर शानदार फीचर्स देण्यात येत आहेत. पंच कारमध्ये देखील क्रूझ कंट्रोल फीचर देण्यात आले आहे. मात्र पंचच्या बेस मॉडेलमध्ये हे फिचर उपलब्ध नाही. पंच कारची एक्स शोरूम किंमत 7.70 लाख रुपये आहे.

टाटा अल्ट्रोझ

टाटा मोटर्सकडून त्यांची अल्ट्रोझ कार देखील क्रूझ कंट्रोल फीचरसह बाजारात सादर करण्यात आली आहे. ही एक ही सर्वात स्वस्त प्रीमियम हॅचबॅक कार आहे. अल्ट्रोझ XT या व्हेरियंटमध्ये क्रूझ कंट्रोल फीचर देण्यात येत आहे. या कारची सूर्यवतीची एक्स शोरूम किंमत 8 लाख रुपये आहे.

ह्युंदाई i20

ह्युंदाई i20 ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. या कारमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात येत आहे. ह्युंदाई i20 या कारच्या Sportz व्हेरियंटमध्ये क्रूझ कंट्रोल फीचर उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.07 लाख रुपयांपासून सुरू होते.