Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

ग्राहकांनो .. चुकूनही सुरक्षेशी तडजोड करू नका! आजच घरी आणा ‘ह्या’ सर्वात Safest Cars; किंमत आहे फक्त 12 लाख

ज्यामध्ये तुम्हाला भन्नाट फीचर्स तसेच बेस्ट मायलेज आणि फीचर्स सुरक्षा पाहायला मिळतात. याच बरोबर या कार्सची किंमत देखील खूपच कमी आहे. चला मग जाणून घ्या देशातील सर्वात सुरक्षित कार्सबद्दल सविस्तर माहिती.

0

Safest Cars : जर तुम्ही नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही आज या लेखात तुम्हाला देशातील सर्वात सुरक्षित कार्सबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक बेस्ट कार घरी आणू शकतात.

हे जाणून घ्या कि आज बाजारात एकपेक्षा एक जबरदस्त कार्स उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला भन्नाट फीचर्स तसेच बेस्ट मायलेज आणि फीचर्स सुरक्षा पाहायला मिळतात. याच बरोबर या कार्सची किंमत देखील खूपच कमी आहे. चला मग जाणून घ्या देशातील सर्वात सुरक्षित कार्सबद्दल सविस्तर माहिती.

5 स्टार सुरक्षा रेटिंगसह येणाऱ्या कारचे तपशील

Volkswagen Virtus

Volkswagen Virtus ही कंपनीची आकर्षक दिसणारी कार आहे. जी 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. बाजारात त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.48 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Volkswagen Tiguan

या लिस्टमध्ये Volkswagen ची  Volkswagen Tiguan ही दुसरी कार आहे.  जी 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. बाजारात त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.62 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात सध्या या कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Tata Altroz

​​ Tata Altroz ​​ टाटाची सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. बाजारात हि कार 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह उपलब्ध आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला या कारसाठी एक्स-शोरूम 6.45 लाख रुपये मोजावे लागणार आहे.

Altroz
 

Mahindra XUV300

Mahindra XUV300 सध्या भारतीय ऑटो बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही कार्सपैकी एक आहे. उत्तम मायलेज आणि बेस्ट सेफ्टी फीचर्ससह ही कार बाजारात धुमाकूळ घालत आहे. ही कार खरेदीसाठी तुम्हाला बाजारात 8.41 लाख (एक्स-शोरूम किंमत) रुपये मोजावे लागणार आहे.

Skoda Slavia

Skoda Slavia ही कार भारतीय ऑटो बाजारात 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह लॉन्च करण्यात आली आहे. ही कार खरेदीसाठी बाजारात ग्राहकांना 11.39 लाख रुपये मोजावे लागतात.

Skoda Kushaq

या लिस्टमध्ये Skoda ची Skoda Kushaq ही दुसरी कार आहे. ज्याला कंपनीने भारतीय ऑटो बाजारात एक्स-शोरूम किंमत 11.59 लाख रुपयांमध्ये लाँच केले आहे. ग्राहकांना या कारमध्ये उत्तम फीचर्स तसेच दमदार मायलेज देखील मिळतो.

Mahindra Scorpio N

जबरदस्त मायलेज आणि बोल्डलूक सह बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक म्हणजे Mahindra Scorpio N. या कारमध्ये ग्राहकांना सर्वात भारी सेफ्टी फीचर्स देखील मिळतात. ही बाजारात एक्स-शोरूम किंमत 12.74 लाखांसह लाँच करण्यात आली आहे. यामुळे जर तुम्ही 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर वरीलपैकी एक कार तुम्ही आरामात घरी आणू शकतात.