Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Electric Cars Tips : तुमच्याकडेही इलेक्ट्रिक कार आहे? तर ही बातमी वाचाच, अन्यथा…

0

Electric Cars Tips : देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशा काळात अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन इलेक्ट्रिक कार सादर करत आहेत. या पेट्रोल डिझेल कारपेक्षा अधिक फायदेशीर मानल्या जात आहेत.

तुमच्याकडेही इलेक्ट्रिक कार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण इलेक्ट्रिक कार वापरताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा इलेक्ट्रिक कार धारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

इलेक्ट्रिक कार वापरताना अनेकजण काही चुका करत असतात. या चुका अनेकदा आर्थिक नुकसान भोगायला लावतात तर काहीवेळा प्रवाशांचे जीवही धोक्यात घालतात. त्यामुळे काही चुका करणे नेहमी टाळले पाहिजे. कारच्या बॅटरी आणि सर्व्हिसिंगकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते.

बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज करू नका

तुमच्याकडेही इलेक्ट्रिक कार असेल तर कार चालवताना कारची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज करू नका. इलेक्ट्रिक कार पूर्णपणे त्यांच्या बॅटरीवर अवलबूंन असते. जर कारची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली तर तुमची कार आहे त्या जागेवरती थांबेल त्यामुळे कारमध्ये किमान 20 ते 80 टक्के चार्ज ठेवावी.

जलद बॅटरी चार्जिंग

इलेक्ट्रिक कारची ड्रायव्हिंग रेंज त्यांच्या मजबूत बॅटरीवर अवलंबून असते. त्यामुळे अशा कारमध्ये बॅटरी सर्वात महत्वाची भूमिका बजावत असते. ज्यावेळी बॅटरी फास्ट चार्जिंग होते तेव्हा ती जास्त गरम होते. जर सतत फास्ट चार्जरचा वापर केला तर बॅटरी लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे सामान्य चार्जरचा वापर करणे कधीही फायदेशीर आहे.

सर्व्हिसिंगची काळजी घ्या

पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारची कमी देखभाल करावी लागते. मात्र असे नाही की इलेक्ट्रिक कारच्या देखभालीकडे दुर्लक्ष करावे. इलेक्ट्रिक कार असली तरी कारच्या बॅटरी आणि इतर पार्टची देखभाल करणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक कार चांगल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे.