Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

EV Retrofitting : सतत पेट्रोल-डिझेल भरून कंटाळला आहात? तर तुमच्या जुन्या पेट्रोल कारला बनवा पूर्णपणे इलेक्ट्रिक, जाणून घ्या कसे ते?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू लागल्याने अनेकजण इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र त्यांच्या किमती जास्त असल्याने अनेकांना त्या खरेदी करणे परवडत नाही. पण आता तुम्ही तुमच्या जुन्या कारला इलेक्ट्रिकमध्ये बदलू शकता.

0

EV Retrofitting : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. त्यामुळे अनेकांना पेट्रोल-डिझेल कार वापरने न परवडण्यासारखे झाले आहे. देशातील ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार दाखल झाल्या आहेत. अशा कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मात्र देशातील इलेक्ट्रिक कारच्या किमती देखील खूपच आहेत. त्यामुळे अनेकांना अशा कार खरेदी करणे न परवडण्यासारखे झाले आहे. पण तुम्ही तुमच्या जुन्या कारला इलेक्ट्रिकमध्ये बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला ईव्ही रेट्रोफिटिंग करावे लागेल. ईव्ही रेट्रोफिटिंग किती फायद्याचे आहे तसेच ते किती महत्वाचे आहे ते जाणून घ्या.

EV रेट्रोफिटिंग

जुन्या पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारला इलेक्ट्रिक कारमध्ये बदलणे म्हणजे ईव्ही रेट्रोफिटिंग होय. ईव्ही रेट्रोफिटिंग करून तुम्ही तुमची जुनी कार पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये बदलू शकता. यामध्ये, इतर सर्व वाहनांचे भाग सामान्य राहतात आणि ब्रेक, हेडलाइट्स सारखे भाग बदलणे किंवा दुरुस्त करणे सोपे होते. तुम्ही तुमचे इलेक्ट्रिक वाहन घरबसल्या चार्ज करू शकता.

सीएनजी कारपेक्षा किती चांगले?

जुन्या कार EV रेट्रोफिटिंग करण्यासाठी RTO ची परवानगी लागते. नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या एजन्सींनाच रेट्रोफिटिंगला परवानगी RTO कडून दिली जाते. सीएनजी कारपेक्षा इलेक्ट्रिक कार कधीही चांगल्या मानल्या जातात. कारण बॅटरीची पूर्ण चाचणी केली जाते आणि त्यानंतरच त्यांना वाहनांवर वापरण्यास मान्यता दिली जाते.

रेट्रोफिटिंगची किंमत किती आहे?

जुन्या कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रेट्रोफिटिंग करायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही. कारला इलेक्ट्रिकमध्ये बदलायचे असेल तर तुम्हाला फक्त किट आणि बॅटरी खरेदी करावी लागेल. नवीन EV च्या किमतीच्या सुमारे 70 टक्के रेट्रोफिटिंगचा वाटा असू शकतो. सध्या किटच्या चढ्या किमतीत जीएसटीचा मोठा वाटा आहे.

रेट्रोफिटिंगचे फायदे?

रेट्रोफिटिंग केल्यानंतर तुमच्या कारचे आयुष्य वाढते. तसेच तुमची कारद्वारे वायू प्रदूषण देखील कमी होईल. तसेच इंधनांचा वापर देखील पूर्णपणे कमी होईल. इंधनावरील पैशांची बचत होईल तसेच अनेक फायदे तुम्हाला होतील.