Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Exter Waiting Period : ह्युंदाई Exter खरेदी करण्‍याचा प्लॅन आहे? तर त्याआधी जाणून घ्या किती महिने करावी लागणार प्रतीक्षा…

ह्युंदाईची लोकप्रिय एसयूव्ही Exter कार खरेदी करायची असेल तर त्याआधी या कारचा प्रतीक्षा कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे. कार खरेदीसाठी प्रतीक्षा कालावधीत वाढ झाली आहे.

0

Exter Waiting Period : ह्युंदाई मोटर्सकडून गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांची मायक्रो एसयूव्ही कार Exter भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. या मायक्रो एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कारची किंमत देखील खूपच कमी आहे.

ह्युंदाई Exeter एसयूव्ही कार पेट्रोल आणि सीएनजी पर्यायामध्ये उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9,99,990 रुपये आहे. कारमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत.

Hyundai Exter प्रतीक्षा कालावधी

तुम्हीही ह्युंदाईची लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही कार Exter खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कारचा प्रतीक्षा कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे. या कारच्या प्रत्येक व्हेरियंटनुसार प्रतीक्षा कालावधी बदलतो.

या कारच्या खरेदीसाठी ग्राहकांना 50 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. प्रतीक्षा कालावधी एंट्री-लेव्हल EX आणि EX(O) दोन व्हेरियंटसाठी आहे. तर टॉप-स्पेक SX(O) AMT आणि SX(O) कनेक्ट AMT वर 22 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे.

ह्युंदाई Exter इंजिन

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Exter कारमध्ये 1.2 लीटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 83 PS पॉवर आणि 113.8 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार सीएनजी मोडमध्ये 27.1 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. 5-स्पीड MT आणि 5-स्पीड AMT असे दोन पर्याय कारमध्ये देण्यात आले आहेत.

ह्युंदाई Exter वैशिष्ट्ये आणि रंग पर्याय

ह्युंदाई Exter एसयूव्ही कारमध्ये दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. डॅशकॅम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, आठ-इंचाची मुख्य इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आलिया आहे. तसेच ही कार कॉस्मिक ब्लू शेड विथ व्हाइट विथ ब्लॅक रूफ, स्टाररी नाईट, फायरी रेड, अॅटलस व्हाइट, टायटन ग्रे आणि कॉस्मिक ब्लू या रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.