Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Volkswagen च्या या कारवर मिळवा १ लाखाची सूट, वाचा सविस्तर.. 

0

या दिवाळीच्या निमित्ताने फोक्सवॅगन आपल्या कार्सवरती उत्तम सूट देत आहे. यामुळे अनेकांना फायदा होणार असून, या कंपनीच्या मिडीयम एसयूव्ही वरती   65,000 इतकी सवलत मिळणार आहे

तर हाई-एंड व्हेरिएन्ट वरती १ लाख रुपयांपर्यंत सूट देणार आहे. जर तुम्ही सुद्धा या दिवाळीला नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याची राहील.

दरम्यान, फोक्सवॅगनची ही ऑफर त्याच्या तैगुन आणि स्कोडा कुशाक, या दोन कार वरती दिली गेली आहे. दरम्यान, या दोन्ही कार्सला सेम फिचर दिले गेले आहेत. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

दरम्यान, या कारला दोन टर्बो-पेट्रोल इंजिन असून,  यामध्ये 1.0-लिटर TSI आहे जो 113 bhp आणि 178 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकतो. यासोबतच यामध्ये 1.5-लिटर TSI इंजिन आहे,

जे 148 bhp पॉवर आणि 250 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Volkswagen ने GT Edge Trail Edition मध्ये आपली Taigun SUV लॉन्च केली आहे. दरम्यान, कंपनीने या कारची किंमत 16.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. तर ही कार कठीण रस्त्यावरही उत्तम चालू शकते.

दरम्यान, ही कार 1.5-लीटर TSI टर्बो पेट्रोल इंजिनसह असणार असून, जे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड ड्युअल-क्लच गिअरबॉक्स पर्यायांसह येते. तसेच या कारचे इंजिन 148 bhp पॉवर आणि 250 Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते.