Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki WagonR Discount : मारुती वॅगनआर खरेदीवर मिळतेय 58 हजारांची मोठी सूट, असा घ्या फायदा

मारुती सुझुकीची लोकप्रिय हॅचबॅक वॅगनआर कार खरेदीची चांगली संधी आहे. कंपनीकडून या महिन्यात 58 हजारांची मोठी सूट दिली जात आहे.

0

Maruti Suzuki WagonR Discount : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक कारवर दिवाळीनिमित्त मोठी ऑफर देण्यात येत आहे. तुम्ही देखील या महिन्यात कार खरेदी करून दिवाळीचा आनंद दुप्पट करू शकता.

मारुती सुझुकीची मायलेज किंग बजेट कार खरेदी करू तुम्ही देखील हजारो रुपयांची बचत करू शकता. तुम्हालाही तुमच्या फॅमिलीसाठी उत्तम मायलेज देणारी स्वस्त ५ सीटर हॅचबॅक कार खरेदी करायची असेल तर वॅगनआर कारचा पर्याय सर्वोत्तम आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर दिवाळी ऑफर

मारुती सुझुकी त्यांच्या ग्राहकांना सतत काही ना काही ऑफर देत असते. त्यामुळे मारुतीच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही दिवाळीत वॅगनआर कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

मारुती सुझुकी वॅगनआर कारवर कंपनीकडून या महिन्यात ५८ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या ऑफरमध्ये रोख सवलत, कॉर्पोरेट बोनस आणि इतर ऑफरचा समावेश आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत ५.५४ लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ७.४२ लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी

मारुती सुझुकी त्यांच्या अनेक कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देत आहे. कारचे सीएनजी मॉडेल ३४ Kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे तर पेट्रोल व्हेरियंट 25 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर इंजिन

मारुती सुझुकीकडून त्यांच्या वॅगनआर कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. 1.0 लीटर पेट्रोल इंजिन जे 67 PS आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देखील देण्यात आले आहे जे 90 PS आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे.