Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Grand i10 Nios Waiting Period : 20 Kmpl मायलेज आणि किंमत फक्त 5 लाख! ह्युंदाईची ही स्टायलिश कार खरेदीसाठी करावी लागणार इतक्या महिन्यांची प्रतीक्षा…

देशातील ऑटो बाजारात दिवसेंदिवस कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये देखील वाढ होत आहे. ह्युंदाईची स्टायलिश आणि दमदार मायलेज देणारी कार खरेदीसाठी ग्राहकांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.

0

Grand i10 Nios Waiting Period : ह्युंदाई मोटर्सकडून भारतीय ऑटो क्षेत्रात अनेक शानदार कार सादर केल्या जात आहेत. तसेच ह्युंदाईच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये देखील प्रचंड वाढ होताना दिसत आहे.

तुम्हीही ह्युंदाईची Grand i10 Nios ही हॅचबॅक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला कारचा प्रतीक्षा कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे. या कारच्या मागणीमध्ये वाढ होत असल्याने कारचा प्रतीक्षा कालावधी देखील वाढत चालला आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची Grand i10 Nios कार एकूण चार व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. जर ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला 14 आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते.

Hyundai Grand i10 Nios व्हेरियंट

ह्युंदाईने त्यांची Grand i10 Nios कार Era, Magna, Sportz आणि Asta या चार व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. जर तुम्हाला कारचे मॅन्युअल व्हेरियंट खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला २ ते ८ आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते.

तसेच Grand i10 Nios कारचे ऑटोमॅटिक व्हेरियंट तुम्ही खरेदी केले तर तुम्हाला 14 आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते. तर Grand i10 Nios सीएनजी व्हेरियंटसाठी तुम्हाला १० आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागेल.

Grand i10 Nios इंजिन पर्याय

ह्युंदाई मोटर्सकडून Grand i10 Nios हॅचबॅक कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय ऑफर करण्यात आला आहे. कारमध्ये 1.2 लीटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 82bhp आणि 114Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन पाच-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

Grand i10 Nios वैशिष्ट्ये

Grand i10 Nios कारमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. कारच्या टॉप मॉडेलमध्ये 6 एअरबॅग्ज पर्याय देण्यात आला आहे तर स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये 4 एअरबॅग्ज पर्याय देण्यात आला आहे.

तसेच Grand i10 Nios कारमध्ये ऑटोमॅटिक एसी, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, क्रूझ कंट्रोल, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, वायरलेस फोन चार्जर, पुश-बटण इंजिन स्टार्ट स्टॉप, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

ह्युंदाईच्या या स्टायलिश कारमध्ये ब्लू फूटवेल अॅम्बियंट लाइटिंग, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, 8-इंच टचस्क्रीन सिस्टम, मागील पार्किंग कॅमेरा, ISOFIX अँकरेज आणि TPMS, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी टाइप-सी चार्जर अशी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.