Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Grand Vitara and Hyryder : मारुती आणि टोयोटाच्या या दोन SUVs मध्ये मिळतात सारखेच फीचर्स, देतात 28 Kmpl मायलेज, पहा किंमत

मारुती सुझुकी आणि टोयोटा कार कंपनीकडून त्यांच्या एकाच प्लॅटफॉर्मवर तयार झालेल्या Grand Vitara आणि Hyryder एसयूव्हीमध्ये जबरदस्त फीचर्स आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे.

0

Grand Vitara and Hyryder : मारुती सुझुकी आणि टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक कार सादर केल्या आहेत. टोयोटा आणि मारुती सुझुकी या दोन कार उत्पादक कंपनीच्या भागीदारीतून अनेक कार सादर करण्यात आल्या आहेत.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर या दोन कार एकाच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही एसयूव्ही कारमध्ये सारखेच फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये पेट्रोल, हायब्रीड आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर या दोन्ही कारचे हायब्रीड व्हेरियंट 27.97 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. या दोन्ही कारमध्ये सारखेच इंजिन पर्याय देण्यात आले आहेत.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर इंजिन

मारुती आणि टोयोटाने त्यांच्या एसयूव्ही कारमध्ये 1.5-लीटर पेट्रोल माइल्ड-हायब्रिड आणि 1.5-लीटर पेट्रोल स्ट्रॉंग-हायब्रिड तसेच 1.5 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. तसेच कारमध्ये सीएनजी पर्याय देखील दिला आहे.

सौम्य-हायब्रिड इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच कारमध्ये ई-सीव्हीटी गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर किंमत आणि वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर या दोन्ही एसयूव्ही कारच्या किमती वेगवेगळ्या आहेत. टोयोटा हायरायडर कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.73 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.74 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा एसयूव्ही कारची एक्स शोरूम किंमत 10.70 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे. या दोन्ही कारमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, अॅम्बियंट लाइटिंग, स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, पॅडल शिफ्टर्स, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर, पॅनोरॅमिक सनरूफ अशी सारखंच वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत.

सुरक्षेसाठी ग्रँड विटारा आणि हायरायडर कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज, एबीएस विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन (EBD), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (VSC), ऑल व्हील डिस्क ब्रेक आणि 360 डिग्री कॅमेरा अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.