Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Grand Vitara CNG : क्रेटाची बत्ती गुल करणार ही शानदार कार! देते 26KM मायलेज, किंमत फक्त १३ लाख

तुम्हीही सर्वोत्तम मायलेज देणारी सीएनजी कार शोधत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकी कंपनीची ग्रँड विटारा ही कार एक चांगला पर्याय आहे. या कारचे मायलेज देखील भन्नाट आहे.

0

Grand Vitara CNG : मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांच्या अनेक सीएनजी कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केल्या आहेत. या कंपनीच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकी कंपनीने आणखी एक सीएनजी कार लॉन्च केली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी मारुती सुझुकी कंपनीकडून ग्रँड विटारा ही SUV कार लॉन्च केली आहे. मारुती सुझुकी कंपनीची ही पहिली माध्यम आकाराची SUV कार आहे. या कारचे सीएनजी मॉडेल देखील कंपनीने लॉन्च केले आहे.

मारुती सुझुकी कंपनीचे ग्रँड विटारा या कारचे हायब्रिड मॉडेल 28 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देते. जर तुम्हाला सीएनजी कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ग्रँड विटारा ही कार सर्वोत्तम आहे.

तुम्हाला ग्रँड विटारा या कारचे स्ट्राँग हायब्रीड मॉडेल खरेदी करायचे असेल तर या कारचे हे मॉडेल 18 लाख सुरुवातीच्या एक्स शोरूम किमतीमध्ये येत आहे. तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला जास्त मायलेज देणारी कार हवी असेल तर तुमच्यासाठी ग्रँड विटारा कार सर्वोत्तम पर्याय आहे.

मारुती सुझुकी कंपनीकडून Grand Vitara या कारचे दोन सीएनजी मॉडेल लॉन्च करण्यात आली आहेत. मारुती सुझुकी Grand Vitara डेल्टा आणि मारुती सुझुकी Grand Vitara झेटा या दोन मॉडेलमध्ये सीएनजी पर्याय देण्यात आला आहे.

मारूती सुझुकी कंपनीची Grand Vitara Delta सीएनजी कारची एक्स शोरूम किंमत 13 लाख रुपये आहे. कंपनीचा असा दावा आहे की ही सीएनजी कार 26.6km/kg पर्यंत मायलेज देते.

इंजिन आणि रंग पर्याय

मारुती सुझुकी कंपनीची Grand Vitara ही SUV रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मिडनाईट ब्लॅक, नेक्सा ब्लू, स्प्लिंडिड सिल्व्हर आणि चेस्टनट ब्राउन असे रंग पर्याय या कारमध्ये दिले जात आहेत.

Grand Vitara कारमध्ये 1462 सीसी इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 121.5Nmपॉवर आणि  4200rpm टॉर्क निर्माण करते. तुमच्यासाठी देखील सर्वोत्तम मायलेज देणारी सीएनजी कार म्हणून Grand Vitara ही एक कार चांगला पर्याय आहे.