Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Grand Vitara vs Hyryder : Grand Vitara की Hyryder कोणती SUV आहे बेस्ट हायब्रीड कार? पहा किंमत आणि फीचर्स

मारुती सुझुकी आणि टोयोटा या कार कंपन्यांकडून त्यांच्या Grand Vitara की Hyryder या कार एकाच प्लॅटफॉर्मवर तयार केल्या आहेत. या कारच्या किमती वेगवेगळ्या आहेत.

0

Grand Vitara vs Hyryder : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या मोठ्या आकाराच्या एसयूव्ही कार सीएनजी आणि हायब्रीड व्हर्जनमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. अशा एसयूव्ही कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मारुती सुझुकी आणि टोयोटा कार उत्पादक कंपन्यांच्या भागीदारीतून एकाच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या अनेक कार सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. टोयोटा आणि मारुती सुझुकीच्या Grand Vitara आणि Hyryder या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Hyryder आणि ग्रँड विटारा या दोन्ही कार एकाच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या आहेत. कारमध्ये सीएनजी, पेट्रोल आणि हायब्रीड पर्याय उपलब्ध आहेत. मात्र कारच्या डिझाईन आणि डायमेंशनमध्ये फरक पाहायला मिळत आहे.

मारुती ग्रँड विटारा

मारुती सुझुकीकडून त्यांची मोठ्या कराची एसयूव्ही कार ग्रँड विटारामध्ये सीएनजी, पेट्रोल आणि हायब्रीड पर्याय दिले आहे. कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, आकर्षक १६ इंच ड्युअल टोन अलॉय व्हील्स आणि 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह अनेक पर्याय देण्यात आले आहे.

कारमध्ये कंपनीकडून 1490 cc सौम्य पेट्रोल आणि सौम्य हायब्रीड इंजिन पर्याय दिला आहे. हायब्रीड व्हेरियंटमध्ये 27.97 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. ग्रँड विटारा सीएनजी कारची एक्स शोरूम किंमत 13.05 लाख रुपये आहे तर बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.70 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेल हायब्रीड कारची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे.

6-स्पीड गिअरबॉक्स

मारुती सुझुकी ग्रँड विटारा कारमध्ये वायरलेस फोन चार्जर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, सहा एअरबॅग आणि 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ असून यात 4 व्हील ड्राइव्ह देखील उपलब्ध आहे. ही कार 9 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

टोयोटा हायराइडर

टोयोटा हायरायडर या मोठ्या एसयूव्ही कारमध्ये 1462 cc ते 1490 cc शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. कारचे दोन्ही इंजिन 86.63 ते 101.64 Bhp पॉवर जनरेट करतात. ही कार देखील पेट्रोल, सीएनजी आणि हायब्रीड व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

टोयोटा हायरायडर एसयूव्ही कार 19.39 ते 27.97 kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. कारच्या हायब्रीड आणि सीएनजी मॉडेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.86 लाख रुपये आहे.

हायराइडर सीएनजी मॉडेलची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 15.44 लाख रुपये आहे तर हायब्रीड व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे. E, S, G आणि V या व्हेरियंटमध्ये ही कार ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारमध्ये सात मोनोटोन आणि चार ड्युअल टोन रंग पर्याय देण्यात आले आहेत.