Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Grand Vitara Waiting Period : ग्रँड विटाराच्या मागणीत प्रचंड वाढ! खरेदीसाठी करावी लागणार इतकी प्रतीक्षा, किंमत फक्त…

मारुती सुझुकी ग्रँड विटारा एसयूव्ही कार खरेदी करणार असाल तर त्याआधी तुम्हाला कारवरील प्रतीक्षा कालावधी जाणून घ्यावा लागेल. कारच्या मागणीत वाढ झाली असून प्रतीक्षा कालावधी देखील वाढला आहे.

0

Grand Vitara Waiting Period : मारुती सुझुकीने गेल्या वर्षी त्यांची दमदार एसयूव्ही कार ग्रँड विटारा सादर करण्यात आली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटारा कारच्या मागणीत वाढ झाल्याने प्रतीक्षा कालावधी देखील वाढला आहे.

सध्या मारुती सुझुकीकडे ग्रँड विटारा कारच्या 25 हजारांहून अधिक ऑर्डर पेंडिंग आहेत. त्यामुळे कारचा प्रतीक्षा कालावधी वाढला आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटारा कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ६ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा किंमत

ग्रँड विटारा एसयूव्ही कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.70 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.83 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकीने त्यांच्या ग्रँड विटारा एसयूव्ही कारमध्ये पेट्रोल, सीएनजी आणि हायब्रीड इंजिन पर्याय दिला आहे. या कारच्या सीएनजी व्हेरियंटला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीएनजी कारवर ग्राहकांना सर्वाधिक जास्त दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मारुती ग्रँड विटारा इंजिन आणि मायलेज

मारुती सुझुकी ग्रँड विटारा कारमध्ये 1462cc K15 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,000 RPM वर सुमारे 100 bhp पॉवर आणि 4400 RPM वर 135 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

कारचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. कारचे हायब्रीड आणि सीएनजी मॉडेल 27.97 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती ग्रँड विटाराची वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी ग्रँड विटारा एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये वायरलेस चार्जिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हवेशीर फ्रंट सीट्स, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि कनेक्टेड कार, मल्टिपल एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESE, हिल होल्ड असिस्ट, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट, पार्किंग सेन्सर्स, 360 डिग्री कॅमेरा असे मानक वैशिष्ट्ये दिली आहेत.