Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Grand Vitara Waiting Period : स्टायलिश आणि डॅशिंग ग्रँड विटारा SUV खरेदीचा प्लॅन आहे? तर त्याआधी जाणून घ्या प्रतीक्षा कालावधी, किंमत आणि फीचर्स

मारुतीची Grand Vitara खरेदीचा प्लॅन आहे तर तुम्हाला ही कार खरेदी करण्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी किंमत, वैशिष्ट्ये आणि प्रतीक्षा कालावधी जाणून घेणे महत्वाचे आहे.

0

Grand Vitara Waiting Period : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या एकापेक्षा एक दमदार एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. तसेच सध्या ऑटो बाजारात एसयूव्ही कारची क्रेझ असल्याचे पाहायला मिळत आहे. एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये वाढ होत आहे.

मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. तसेच या कंपनीच्या कार सर्वाधिक विक्रीमध्ये अव्वल स्थानी आहेत. मारुती सुझुकीच्या कारमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने कार खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

तुम्हीही मारुती सुझुकीची शानदार एसयूव्ही Grand Vitara कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कार खरेदी करण्यासाठी किती महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल हे पाहणे गरजेचे आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा या एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ होता आहे. तसेच ग्रँड विटारा या कारच्या 27 हजार ऑर्डर प्रलंबित आहेत. त्यामुळे ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 26 आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा किंमत

मारुती सुझुकी ग्रँड विटारा कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.70 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.90 लाख रुपये आहे. त्यामुळे ग्राहकांना स्टायलिश आणि डॅशिंग कार अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा स्पेसिफिकेशन्स

मारुती सुझुकीकडून त्यांच्या ग्रँड विटारा एसयूव्ही कारमध्ये हायब्रीड इंजिन देण्यात आले आहे. या कारमध्ये दोन मोटर्स देण्यात आल्या आहेत. कारमध्ये पहिले पेट्रोल इंजिन जे सामान्य इंधन इंजिनसारखे आणि दुसरे इलेक्ट्रिक मोटर इंजिन जे कारच्या इंधनावर चार्ज होते.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा इंजिन

मारुती सुझुकी ग्रँड विटारा या एसयूव्ही कारचे इंजिन हायब्रीड मोडमध्ये इलेक्ट्रिक जनरेटरसारखे काम करते जे EV मोटर कारच्‍या चाकावरून चार्ज होते. हे इंजिन 79hp पॉवर आणि 141Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हायब्रिड पॉवरट्रेन 115 एचपीचा टॉर्क जनरेट करते. हे E-CVT गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटाराची वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी ग्रँड विटारा कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. कारमध्ये वायरलेस चार्जिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, मल्टिपल एअरबॅग, एबीएस विथ ईबीडी, ईएसई, हिल होल्ड असिस्ट, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट, पार्किंग सेन्सर्स अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.