Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hf Delux Bike EMI Plan : अवघ्या 8 हजारांत घरी आणा 70 Kmpl मायलेज देणारी बाईक

बाईक खरेदी करण्यासाठी बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण आता अवघ्या ८ हजार रुपयांमध्ये 70 Kmpl मायलेज देणारी बाईक घरी आणू शकता.

0

Hf Delux Bike EMI Plan : प्रत्येकाचे स्वतःच्या मालकीची बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र कमी बजेटमुळे अनेकांना बाईक खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता अगदी कमी बजेटमध्ये बाईक खरेदी करणे शक्य आहे.

तुम्हालाही या दिवाळीमध्ये दमदार मायलेज देणारी बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी उत्तम बाईक पर्याय बाजारात उपलब्ध आहे. Hf Delux बाईक तुम्ही आता अवघ्या ८ हजारांमध्ये खरेदी करू शकता.

हिरो Hf Delux बाईकवर कंपनीकडून कमी बजेट ग्राहकांना EMI पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. अवघ्या ८ हजार रुपयांच्या डाउनपेमेंटमध्ये तुम्ही Hf Delux बाईक घरी आणू शकता.

Hf Delux बाईक किंमत

Hf Delux बाईक कमी बजेट ग्राहकांना फायदेशीर बाईक आहे. कारण बाईकमध्ये दमदार फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन दिले आहे. बाईकची एक्स शोरूम किंमत 67,268 रुपये आहे तर हीच ऑन-रोड किंमत 81,629 रुपये आहे.

तुम्हालाही कमी बजेटमध्ये Hf Delux बाईक खरेदी करायची असेल तर ८ हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरून ही कार घरी आणू शकता. त्यानंतर तुम्हाला बँकेकडून तुम्हाला कर्ज पुरवठा केला जाईल. कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दरमहा EMI भरावा लागेल.

Hf Delux बाईक EMI पर्याय

Hf Delux बाईक खरेदीसाठी फायनान्स कंपनीकडून किंवा बँकेकडून तुम्हाला वार्षिक 9.7 टक्के दराने कर्ज दिले जाईल. हे कर्ज 36 महिन्यांसाठी वैध असेल. 36 महिन्यांमध्ये तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी वेळ दिला जाईल.

८ हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरल्यानंतर तुम्हाला 36 महिने दरमहा 2,165 रुपयांचा EMI भरावा लागेल. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू अधिक माहिती मिळवू शकता.

Hf Delux इंजिन आणि मायलेज

Hf Delux बाईकमध्ये 97.2 cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असून ते 8.02 ps ची कमाल पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. १ लिटर पेट्रोलमध्ये 70 kmpl मायलेज देण्यास बाईक सक्षम आहे. बाईकमध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत.