Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Himalayan 450 Bike : अवघ्या 10 हजारांत बुक करा Himalayan 450! मिळाले इतके शक्तिशाली इंजिन

भारतीय दुचाकी मार्केटमध्ये लवकरच रॉयल एनफिल्डची Himalayan 450 बाईक शक्तिशाली इंजिनसह लॉन्च केली जाणार आहे. या बाईकमध्ये ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Himalayan 450 Bike : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक दुचाकी कंपन्यांच्या शक्तिशाली बाईक लॉन्च करण्यात आल्या आहेत. रॉयल एनफिल्डकडून त्यांच्या अनेक शक्तिशाली इंजिनसह येणाऱ्या बाईक भारतात सादर केल्या आहेत. रॉयल एनफिल्डच्या बुलेट बाईकला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तुम्हालाही रॉयल एनफिल्डची नवीन बाईक खरेदी करायची असेल तर जरा थांबा. कारण तुम्ही रायडींगसाठी रॉयल एनफिल्डची नवीन Himalayan 450 बाईक खरेदी करू शकता. बाईकमध्ये शक्तिशाली इंजिन दिले आहे. तसेच उत्कृष्ट फीचर्स देखील देण्यात जे तुमच्या रायडींगचा आनंद वाढवतील.

Autocar

रॉयल एनफिल्डने त्यांची Himalayan 450 बाईक जागतिक बाजारपेठेत लॉन्च केली आहे. लवकरच ही बाईक भारतात देखील लॉन्च केली जाणार आहे. तसेच या बाईकचे भारतात बुकिंग सुरु केले आहे.

गोव्यात होणाऱ्या आरई मोटोवर्स येथे Himalayan 450 बाईक लॉन्च केल्यानंतर २४ नोव्हेंबरनंतर बाईकची डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली जाणार आहे. तुम्हालाही नवीन Himalayan 450 बाईक खरेदी करायची असेल तर 10,000 रुपयांमध्ये प्री-बुकिंग करू शकता.

2024 Himalayan 450 इंजिन

रॉयल एनफिल्डकडून त्यांच्या सर्वच बाईकमध्ये शक्तिशाली इंजिन पर्याय देण्यात आला आहे. बाईकचे इंजिन लिक्विड-कूल्ड इंजिन, बनावट पिस्टनसह हलके घटक, ऑल-डिजिटल कन्सोल, राईड-बाय-वायरसह देण्यात आले आहे.

बाईकमध्ये 450 सीसी शेर्पा इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,000 rpm वर 39.4 bhp आणि 5,500 rpm वर 40 Nm जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

वैशिष्ट्ये

अ‍ॅडव्हेंचर टूरर 43 मिमी USD फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस 7-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉकसह सर्व-नवीन ट्विन-स्पार प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. ड्युअल-चॅनेल ABS सह बाईक सर करण्यात आली आहे.

नवीन Himalayan 450 बाईकला इको आणि परफॉर्मन्स असे दोन रायडींग पर्याय देण्यात आले आहेत. तसेच 17 लिटरची मोठी इंधन टाकी देण्यात आली आहे. स्टॉक सीटची उंची 845 मिमी पर्यंत वाढवण्यात आली आहे. बाईकला 21-इंच फ्रंट आणि 17-इंच मागील स्पोक व्हील देण्यात आले आहे.