Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Himalayan 450 On Road Price : हिमालयन 450 बाईक खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील ऑन रोड किंमत

रॉयल एनफील्डची नवीन शक्तिशाली हिमालयन 450 बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरातील ऑन रोड किंमत जाणून घेणे गरजेचे आहे.

0

Himalayan 450 On Road Price : रॉयल एनफील्ड दुचाकी निर्मात्या कंपनीकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या अनेक शक्तिशाली बाईक सादर केल्या आहेत. अलीकडेच रॉयल एनफील्डने त्यांची हिमालयन 450 बाईक लॉन्च केली आहे.

हिमालयन 450 बाईकमध्ये शक्तिशाली इंजिन पर्याय देण्यात आला आहे. तसेच बाईकचे डिझाईन देखील स्टायलिश बनवण्यात आले आहे. बाईकमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. ऑफ रोडींग रायडींगसाठी हिमालयन 450 बाईक उत्तम पर्याय आहे.

रॉयल एनफील्डने हिमालयन 450 बाईक एलईडी हेडलॅम्प, एलईडी टर्न इंडिकेटर, दोन स्टॉपलाइट्स, एक छोटा एक्झॉस्ट आणि नवीन 4-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशा वैशिष्ट्यांसह सादर केली आहे. बाईकची एक्स शोरूम किंमत 2.69 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 इंजिन

रॉयल एनफील्डने हिमालयन 450 बाईकमध्ये शक्तिशाली इंजिन दिले आहे. बाईकमध्ये 450 cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 40 hp कमाल पॉवर आणि 40 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. बाईकला असिस्ट आणि स्लिपर क्लच देण्यात आला आहे.

Royal Enfield Himalayan 450 चे स्पेसिफिकेशन्स

Royal Enfield बाईक निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या पूर्वीच्या हिमालयन बाईकपेक्षा आताची Himalayan 450 बाईक वजनाने हलकी केली आहे. बाईकचे वजन 196 किलो आहे.

बाईकमध्ये Google मॅप नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फुल-एलईडी लाइटिंग, राइड-बाय-वायर थ्रॉटल आणि स्विच करण्यायोग्य एबीएसला सपोर्ट करणारी मोठी TFT स्क्रीन असे पर्याय देण्यात आले आहेत. ही बाईक KTM 390 Adventure आणि BMW G310 GS शी स्पर्धा करते.

रॉयल एनफील्ड हिमालयन 450 ऑन रोड किंमत

रॉयल एनफील्ड हिमालयन 450 बाईकची एक्स शोरूम किंमत 2.69 लाख रुपये आहे. मात्र देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये बाईकची ऑन रोड किंमत वेगवेगळी असू शकते.

हिमालयन 450 बाईकची मुंबईतील ऑन रोड किंमत 3.24 लाख रुपये आहे. तर पुण्यातील हिमालयन 450 बाईकची ऑन रोड किंमत 3.24 लाख रुपयेच आहे. दिल्लीमधील या बाईकची ऑन रोड किंमत 3.13 लाख रुपये आहे.