Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda 7 Seater SUV : सफारी फेसलिफ्टला टक्कर देण्यासाठी होंडा सज्ज! लॉन्च करणार जबरदस्त 7-सीटर SUV, पहा किंमत

होंडा मोटर्स त्यांची ७ सीटर कार लॉन्च करण्यासाठी सज्ज असल्याचे बोलले जात आहे. लवकरच ७ सीटर सेगमेंटमध्ये शक्तिशाली एसयूव्ही कार सादर केली जाऊ शकते.

0

Honda 7 Seater SUV : भारतीय ऑटो बाजारासाठी या वर्षाचे शेवटचे महिने खास ठरणार आहेत. कारण ऑटो बाजारात आणखी काही शानदार कार सादर केल्या जाणार आहेत. टाटा मोटर्सच्या आगामी हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट कार लवकरच भारतीय ऑटो बाजारात दाखल होऊ शकतात.

मात्र टाटा मोटर्सची सफारी फेसलिफ्ट कार लॉन्च होण्यापूर्वीच कारच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची जबरदस्त ७ सीटर एसयूव्ही कार लॉन्च करण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे.

होंडा कार कंपनीकडून अलीकडे त्यांची Elevate एसयूव्ही कार सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता होंडा मोटर्स Elevate कारचे ७ सीटर व्हेरियंट लवकरच भारतात लॉन्च करणार आहे.

Honda Elevate 7-सीटर

होंडा मोटर्सकडून त्यांच्या Elevate 7-सीटर एसयूव्ही कारवर काम सुरु केल्याचे बोलले जात आहे. ७ सीटर कारचा विस्तार वाढवण्यासाठी होंडाकडून मोठे पाऊल उचलले जात असल्याचे सांगितले जात आहे. या कारमध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात.

Elevate कारमध्ये काय बदल होऊ शकतो?

एलिव्हेट 7-सीटरला थोडेसे वेगळे डिझाईन पाहायला मिळू शकते. कारमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे कारच्या सीट्समध्ये वाढ करणे हा आहे. सध्या Elevate एसयूव्ही कार ५ सीटरमध्ये विकली जात आहे.

नवीन Elevate ७ सीटर एसयूव्हीमध्ये नवीन एलईडी हेडलॅम्प, लोखंडी जाळी आणि बंपर पाहायला मिळू शकते. कारची उंची कायम ठेऊन कारच्या लांबीमध्ये बदल केला जाऊ शकतो.

एलिव्हेट 7-सीटरमध्ये पॅनोरामिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री कॅमेरा, हवेशीर फ्रंट सीट्स, मागील सनब्लाइंड्स इत्यादी नवीन वैशिष्ट्ये मिळू शकतात.

इंजिन तपशील

एलिव्हेट एसयूव्ही कारमध्ये सध्या 1.5-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 119bhp पॉवर आणि 145Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. मात्र ७ सीटर एसयूव्हीमध्ये हेच इंजिन कायम ठेवले जाईल की नवीन इंजिन पर्याय दिला जाईल याबाबत अद्याप माहिती उघड झालेली नाही. या कारचे इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील येत्या २ ते ३ वर्षात दाखल केले जाऊ शकते.

Honda Elevate 7-सीटर – लॉन्च आणि किंमत

Honda कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या आणखी ४ नवीन यूएसयूव्ही कार २०३० पर्यंत भारतात दाखल केल्या जाणार आहेत. एलिव्हेट 7-सीटर 2024 किंवा 2025 मध्ये भारतात दाखल केली जाऊ शकते.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ५ सीटर Elevate एसयूव्हीपेक्षा ७ सीटर Elevate २ लाख रुपयांनी महाग असू शकते. एलिव्हेट 7-सीटरची ऑन रोड किंमत 15 लाख रुपयांपासून सुरू होऊन 21 लाख रुपये जाऊ शकते.