Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda Amaze 2024 : प्रीमियम फीचर्स आणि आकर्षक लुकसह होंडा Amaze अवतरणार नव्या रूपात ! होणार हे मोठे बदल

0

Honda Amaze 2024 : देशात कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कार खरेदीदारांची संख्या वाढल्याने अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन कार सादर करत आहेत. होंडा कार निर्मात्या कंपनीकडून देखील त्यांची Amaze कारचे नवीन जनरेशन मॉडेल सादर केले जाणार आहे.

होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Amaze कारचे नवीन मॉडेल 2024 मध्ये लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. होंडाकडून Amaze कारमध्ये अनके मोठे बदल केले जाणार असून कारचे डिझाईन देखील अधिक आकर्षक बनवण्यात येणार आहे.

Honda Amaze मध्ये अनेक मोठे बदल होणार

Honda Amaze सेडान कार लोकप्रिय कारपैकी एक आहे. ग्राहकांचा या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2013 मध्ये होंडाने प्रथम Amaze सेडान कार भारतात लॉन्च केली होती. आता कारचे नवीन जनरेशन मॉडेल अद्ययावत डिझाइन, इंटीरियर अपडेट्स आणि नवीन वैशिष्ट्यांसह बाजारात पुन्हा एकदा लॉन्च केले जाणार आहे.

नवीन Honda Amaze वैशिष्ट्ये

नवीन जनरेशन Amaze सेडान कारमध्ये प्रगत ड्रायव्हर असिस्ट सिस्टम (ADAS) हे जबरदस्त सुरक्षा फीचर्स जोडले जाऊ शकते. ADAS फीचर्समध्ये लेन असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक ब्रेकिंग असे अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असू शकतो.

नवीन Amaze सेडान कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो-डिमिंग IRVM, अॅम्बियंट लाइटिंग, लेन-वॉच कॅमेरा, वायरलेस फोन चार्जर, 7.0-इंच सेमी-एनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि तत्सम वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात.

New Honda Amaze इंजिन

होंडा कार उत्पादक कंपनीकडून नवीन जनरेशन होंडा Amaze कारमध्ये सध्या देण्यात येणारे 1.2L, 4-सिलेंडर iVTEC इंजिन कायम ठेवले जाणार आहे. कारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही.

हे इंजिन 90 bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले असेल.

New Honda Amaze किंमत

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Amaze सेडान कारची एक्स शोरूम किंमत 7.10 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.86 लाख रुपये आहे. सध्याच्या किमतीपेक्षा नवीन Amaze कारची किंमत थोडी जास्त असू शकते. कंपनीकडून लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.