Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda Amaze Price Hike : होंडाचा ग्राहकांना धक्का! 19kmpl मायलेज देणाऱ्या स्टायलिश कार Amaze च्या किमतीत केली मोठी वाढ, पहा नवीन किंमत

होंडा कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कारण कंपनीकडून त्यांच्या लोकप्रिय सेडान कार Amaze च्या किमतीत मोठी वाढ केली आहे.

0

Honda Amaze Price Hike : होंडा कार उत्पादक कंपनीकडून भारतीय बाजारपेठेतील कंपनीचा पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी अनेक नवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. अलीकडेच कंपनीने त्यांची शानदार आणि शक्तिशाली एसयूव्ही कार Elevate लॉन्च केली आहे.

आता होंडा कंपनीने त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कारण त्यांनी लोकप्रिय कार Amaze च्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना Amaze कार खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

होंडा Amaze च्या किमतीत किती झाली वाढ

होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Amaze या सेडान कारची किंमत 6,900 रुपयांनी वाढवली आहे. आता होंडा Amaze या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.10 लाख रुपयांपासून सुरू होते. होंडा Amaze व्यतिरिक्त City या कारची किंमत देखील वाढवली आहे. कंपनीने City e-HEV आणि Elevate या कारच्या किमतीमध्ये कोणताही बदल केला नाही.

होंडा Amaze च्या सॉलिड कलर व्हेरियंटच्या किमतीत 4,900 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर मेटॅलिक कलर व्हेरियंटची किंमत 6,900 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना ही कार वाढीव किमतीमध्ये खरेदी करावी लागणार आहे. एंट्री-लेव्हल E MT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 7.10 लाखापासून सुरू होते. तर टॉप-एंड VX CVT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 9.77 लाख रुपये झाली आहे.

Honda च्या पोर्टफोलिओमध्ये Elevate ची एंट्री

होंडा कंपनीकडून ४ सप्टेंबर रोजी त्यांची Elevate एसयूव्ही कार सादर केली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 11 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 18.90 लाख रुपये आहे. होंडा कंपनीकडून लवकरच Elevate कार इलेक्ट्रिक रूपात सादर केली जाणार आहे. ही एक मध्यम आकाराची एसयूव्ही कार आहे.

10.25-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

Elevate च्या टॉप-एंड ZX व्हेरियंटमध्ये तपकिरी लेदर अपहोल्स्ट्री, 10.25-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो-डिमिंग आणि डे/नाईट IRVM, ADAS-आधारित ड्रायव्हर-असिस्ट, 8-स्पीकर, सहा एअरबॅग, सॉफ्ट-टच डॅशबोर्ड फिनिशिंग देण्यात आली आहे.