Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda Cars Discounts : अशी संधी पुन्हा नाही! होंडा कारवर 1 लाखांपर्यंत बंपर सूट, Amaze ते City सेडान कारचा समावेश

कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर याच महिन्यात पूर्ण होईल. कारण सप्टेंबर २०२३ महिन्यात होंडाकडून त्यांच्या कारवर 1 लाखांपर्यंत बंपर सूट देण्यात येत आहे.

0

Honda Cars Discounts : सप्टेंबर २०२३ या महिन्यात तुम्हीही होंडा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक सेडान कारवर मोठी ऑफर दिली जात आहे. तुम्ही देखील कार खरेदीवर लाखोंची बचत करू शकता.

होंडा कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो बाजारात त्यांच्या सेडान कार सादर केल्या आहेत. त्यांच्या या कारवर मोठी ऑफर देण्यात येत असल्याने ग्राहकांच्या १ लाख रुपयांची बचत होत आहे. सप्टेंबर २०२३ या महिन्यात होंडाच्या कारवर मोठी ऑफर देण्यात येत आहे. ही ऑफर ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात येत आहे.

होंडाकडून सिटी हायब्रीड ते Amaze या सेडान कारवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यामध्ये एक्सचेंज बोनस, लॉयल्टी बोनस, कॉर्पोरेट सवलत दिली जात आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या कारवर ऑफर दिली जात आहे.

होंडा अमेझ

होंडा कंपनीकडून त्यांच्या लोकप्रिय अमेझ सेडान कारवर 16,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि 6,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे. या कारवर एक्सचेंज बोनस देण्यात येत नाही.

Fifth-Gen Honda City

होंडा कंपनीची Fifth-Gen Honda City कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याच महिन्यात करा. कारण Fifth-Gen Honda City पेट्रोल व्हेरिएंटवर 10,000 रुपयांपर्यंत रोख सूट देण्यात येत आहे.

तसेच 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूटही देण्यात येत आहे. जर तुमच्याकडे जुनी होंडा कार असेल तर तुम्ही ती एक्सचेंज करून 20,000 रुपयांपर्यंतचा बोनस देखील देण्यात येत आहे.

सिटी हायब्रीड

होंडा सिटी हायब्रीड कारवर सर्वात मोठी ऑफर देण्यात येत आहे. या कारवर कंपनीकडून 1 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यामध्ये रोख सवलत आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 18.89 लाख रुपये तर 20.39 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.