Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda Cars Offer : फेस्टिवल ऑफर ! Honda च्या 2 लोकप्रिय सेडान कारवर मिळतेय 75,000 रुपयांपर्यंतची बंपर सूट, असा घ्या लाभ

होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या लोकप्रिय सेडान कारवर ३१ ऑक्टोबरपर्यंत मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे होंडाच्या कार खरेदीसाठी हा महिना खास ठरणार आहे.

0

Honda Cars Offer : देशात सध्या सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकजण या शुभमुहूर्तावर नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असतात. अशा काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कार कंपन्यांकडून त्यांच्या कारवर मोठी सूट दिली जाते.

जपानी होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या लोकप्रिय दोन कारवर या महिन्यात मोठी ऑफर देण्यात येत आहे. होंडाच्या या दोन सेडान कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता. Honda City fifth gen आणि Honda Amaze या दोन सेडान कारवर ग्राहकांना मोठी सूट देण्यात येत आहे.

ऑक्टोबर २०२३ या महिन्यात ग्राहकांना ही सूट दिली जात आहे. ऑक्टोबर महिना संपेपर्यंतच कारवर सूट देण्यात येत आहे. या दोन्ही कारवर ग्राहकांना 75,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. त्यामुळे या महिन्यात कार खरेदी करून पैशांची मोठी बचत करू शकता.

Honda Cars या वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे

31 ऑक्टोबरपर्यंत होंडा कार निर्मात्या कंपनीकडून Honda City Fifth Gen आणि Honda Amaze या दोन सेडान कारवर ऑफर देण्यात येत आहे. या ऑफरमध्ये कॅशबॅक, मोफत अॅक्सेसरीज, लॉयल्टी आणि एक्सचेंज बोनस तसेच कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे.

होंडा सिटी कार खरेदी करणाऱ्यांना या ऑफरचा सर्वाधिक फायदा होणार आहे. Honda City Fifth Gen सेडानच्या नवीन ग्राहकांना 25,000 रुपयांपर्यंत रोख सूट किंवा 26,947 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज आणि 4,000 रुपयांचा लॉयल्टी बोनसही दिला जाणार आहे.

होंडा कार एक्सचेंज ऑफर

जर तुमच्याकडे जुनी होंडा कार असेल आणि तुम्ही ती एक्सचेंज केली तर तुम्हाला 6,000 रुपयांची सूट दिली जाईल. एक्सचेंज फायदे 15,000 रुपयांपर्यंत दिले जातील. City Fifth Gen सेडान कारवर दोन कॉर्पोरेट सूट पॅकेजेस देखील उपलब्ध आहेत.

Honda Amaze sedan कारवर 57,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. 20,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 5,000 मानक सवलत Amaze सेडान कारवर दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता.