Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda CB200X Bike : होंडाची जबरदस्त स्पोर्टी बाईक लॉन्च! 10 वर्षांची वॉरंटी आणि शक्तिशाली इंजिन, किंमतही फक्त…

स्पोर्ट बाईक प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता होंडाकडून नवीन स्पोर्टी लूक बाईक लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकमध्ये शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे.

0

Honda CB200X Bike : होंडा दुचाकी उत्पादक कंपनीकडून त्यांची आणखी एक शक्तिशाली स्पोर्ट बाईक भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. होंडाकडून OBD2 नियमांनुसार 2023 CB200X स्पोर्टी बाईक लॉन्च करण्यात आली आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे विक्री आणि विपणन संचालक योगेश माथूर म्हणाले, “OBD2 नॉर्म्स इंजिन, स्टायलिश ग्राफिक्स आणि नवीन असिस्ट आणि स्लिपर क्लचसह 2023 CB200X सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. 180 ते 200cc मोटरसायकल सेगमेंट अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.”

CB200X बाईक किंमत

होंडा CB200X या बाईकची किंमत देखील स्पोर्ट बाईकच्या तुलनेत कमी ठेवण्यात आली आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 1,46,999 रुपये आहे. जर तुम्हालाही ही बाईक खरेदी करायची असेल तर जवळच्या होंडा डिलरशिपला भेट देऊन तुम्ही ही बाईक खरेदी करू शकता.

2023 Honda CB200X ची वैशिष्ट्ये

होंडा कंपनीकडून त्यांच्या नवीन CB200X बाईकमध्ये इतर बाईकपेक्षा वेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. या बाईकचे इंजिन देखील इतर बाईकच्या तुलनेत प्रीमियम आहे. तसेच बाईकचा लूक देखील आकर्षक बनवण्यात आला आहे.

बाईकला शार्प फेअरिंग, नकल गार्ड-माउंट केलेले एलईडी टर्न इंडिकेटर, फुल एलईडी हेडलाइट्स आणि गोल्ड-फिनिश USD टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स याला प्रिमियम लूक देतात. त्यामुळे स्पोर्ट बाईक खरेदी करण्यासाठी ही एक उत्तम बाईक आहे.

या बाईकमध्ये कंपनीकडून 184.40cc, 4 स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर BSVI OBD2 PGM-FI इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन आता आणखी इको-फ्रेंडली असणार आहे. हे इंजिन 8,500 rpm वर 17 bhp ची पॉवर आणि 6,000 rpm वर 15.9 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे.

Honda CB200X बाईकमध्ये सेन्सर देण्यात आले आहेत. बाईकमध्ये काही त्रुटी असल्यास ते लगेच पॅनेलवर अलर्ट जारी करतील. रायडरची सुरक्षितता वाढवण्यासाठी यात सिंगल-चॅनल ABS सह ड्युअल पेटल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. एक नवीन असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील देण्यात आला आहे.

बाईकमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल देण्यात आला आहे. यामध्ये स्पीडोमीटर, ओडोमीटर, टॅकोमीटर, इंधन गेज, ट्विन ट्रिप मीटर, बॅटरी व्होल्टमीटर, गियर पोझिशन आणि एक घड्याळ समाविष्ट आहे. कंपनीकडून बाईकला 10 वर्षांचे वॉरंटी पॅकेज देण्यात आले आहे.