Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda CB350 Bike : या ५ उत्कृष्ट फीचर्समुळे खास आहे Honda CB350 बाईक, पहा किंमत आणि मायलेज

तुम्हालाही 350 सेगमेंटमधील स्वस्त बाईक खरेदी करायची असेल तर Honda CB350 बाईक उत्तम पर्याय आहे. या बाईकमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Honda CB350 Bike : देशातील दुचाकी मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या स्वस्त आणि दमदार मायलेज देणाऱ्या बाईक सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तसेच महागड्या बाईक देखील दुचाकी बाजारात उपलब्ध आहेत. या बाईक्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

होंडा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची 350 सीसी सेगमेंटमध्ये त्यांची नवीन बाईक सादर केली आहे. अलीकडेच ही बाईक कंपनीकडून भारतात लाँच करण्यात आली आहे. तुम्हीही ही 350 सेगमेंटमधील बाईक खरेदी करू शकता.

होंडा CB350 डिझाईन

होंडा CB350 बाईकमध्ये रेट्रो लुक देण्यासाठी बाईकचे डिझाईन पुन्हा अद्यावत केले आहे. बाईकचे मेटल फेंडर आता लांब देण्यात आले आहेत. तसेच बाईकला स्प्लिट सीट्स आणि मेटॅलिक फोर्क कव्हर्स देण्यात आले आहेत.

बाईकमध्ये एक्झॉस्ट देखील नवीन देण्यात आले असल्याने बाईकचा लूक आणखी आकर्षक होत आहे. कंपनीकडून ही बाईक ५ रंग पर्यायामध्ये सादर केली आहे. रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट क्रस्ट मेटॅलिक, मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक आणि मॅट ड्यून ब्राउन या पाच रंग पर्यायामध्ये ही बाईक बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहे.

होंडा CB350 इंजिन

होंडा बाईक निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या CB350 बाईकमध्ये 348.36 cc, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5,500 rpm वर 20.78 bhp कमाल पॉवर आणि 3,000 rpm वर 29.4 Nm चे पीक टॉर्क आउटपुट तयार करण्यास सक्षम आहे. बाईकचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

होंडा CB350 वैशिष्ट्ये

होंडा बाईक कंपनीकडून CB350 बाईकमध्ये पुढील बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन गॅस-चार्ज केलेले शॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. समोरील बाजूस 310 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 240 मिमी डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. ड्युअल-चॅनल ABS देखील बाईकमध्ये ऑफर करण्यात आले आहे.

Honda CB350 वैशिष्ट्ये

Honda CB350 बाईकमध्ये सर्व LED लाइटिंग आणि डिजी-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह, स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टम, ट्रॅक्शन कंट्रोल, आपत्कालीन स्टॉप सिग्नल असे फीचर्स देण्यात आले आहेत.

Honda CB350 किंमत आणि व्हेरियंट

होंडा बाईक कंपनीकडून CB350 बाईक दोन व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. CB350 DLX ची एक्स शोरूम किंमत 1,99,900 रुपये आहे तर CB350 DLX Pro ची एक्स शोरूम किंमत 2,17,800 रुपये आहे.