Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda City Price Hike : होंडाचा ग्राहकांना मोठा धक्का! लोकप्रिय कारच्या किमतीत केली वाढ, जाणून घ्या व्हेरियंटनुसार नवीन किमती

होंडा कंपनीकडून पुन्हा एकदा त्यांच्या लोकप्रिय सेडान कारच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहाकांना आता नवीन किमतीनुसार कार खरेदी करावी लागणार आहे.

0

Honda City Price Hike : होंडा कंपनीकडून ग्राहकांना पुन्हा एकदा मोठा धक्का देण्यात आला आहे. कंपनीकडून लोकप्रिय कारच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना नवीन किमतीनुसार कार खरेदी करावी लागणार आहे. कार खरेदीसाठ ग्राहकांना जास्तीचे पैसे द्यावे लागतील.

होंडा कार उत्पादक कंपनीकडून लोकप्रिय सेडान सिटी कारच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. सप्टेंबर महिन्यात कारची किंमत वाढवण्याचा निर्णय होंडाकडून घेण्यात आला आहे. आता ग्राहकांना नवीन किमतीमध्ये कार खरेदी करावी लागणार आहे.

होंडा City सेडान कारची 7900 रुपयांनी म्हणजेच सुमारे 8 हजार रुपयांनी किंमत वाढवण्यात आली आहे. ग्राहकांना आता ही कार खरेदी करण्यासाठी 8 हजार रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

होंडा City सेडान कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 11 लाख 63 हजार रुपये आहे. ही कार एकूण ४ व्हेरियंटमध्ये आणि सहा वेगवेगळ्या रंगामध्ये सादर करण्यात आली आहे. कारच्या प्रत्येक व्हेरियंटची किंमत वेगवेगळी आहे. तुम्हालाही Honda City कार खरेदी करायची असेल तर त्याआधी तुम्हाला प्रत्येक व्हेरियंट आणि त्यांच्या नवीन किमती जाणून घेणे गरजेचे आहे.

होंडा सिटी नवीन किंमत

होंडाकडून सिटी कारची किंमत वाढवल्यानंतर या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11 लाख 63 हजार रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 16 लाख 2 हजार रुपयांपर्यंत जाते.

व्हेरिएंट एक्स-शोरूम किंमत

SV MT एक्स-शोरूम किंमत 11,62,900 रुपये

V MT एक्स-शोरूम किंमत 12,50,900 रुपये

VX MT एक्स-शोरूम किंमत 13,62,900 रुपये

CVT एक्स-शोरूम किंमत 13,75,900 रुपये

ZX MT एक्स-शोरूम किंमत 14,85,900 रुपये

VX CVT एक्स-शोरूम किंमत 14,87,900 रुपये

ZX CVT एक्स-शोरूम किंमत 16,01,900 रुपये

सिटी आणि अमेझ या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार आहेत

होंडा कार उत्पादक कंपनीच्या सिटी आणि अमेझ या दोन सेडान कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार आहेत. कंपनीकडून या कार सर्वाधिक विकल्या जात आहेत. सिटी कारचा विक्रीमध्ये 37 टक्के वाटा आहे तर अमेझचा कारचा विक्रीमध्ये 26 टक्के वाटा आहे.