Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda Elevate : Creta, Grand Vitara आणि Toyota Hyryder ला टक्कर देते होंडाची डॅशिंग SUV, खरेदीसाठी करावी लागेल इतकी प्रतीक्षा…

होंडाकडून नुकतीच त्यांची डॅशिंग आणि शक्तिशाली इंजिन असलेली शानदार एसयूव्ही लॉन्‍च केली आहे. मात्र नुकतीच लॉन्‍च झालेल्या एसयूव्ही खरेदी तुम्हाला काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते.

0

Honda Elevate : होंडा कार निर्मात्या कंपनीकडून अलीकडेच त्यांची आणखी एक डॅशिंग Elevate एसयूव्ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार लॉन्‍च होण्यापूर्वीच हजारो बुकिंग झाले होते.

तुम्हीही होंडाची Elevate एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला कार खरेदीसाठी किती महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया होंडा Elevate प्रतीक्षा कालावधी…

Honda Elevate SUV प्रतीक्षा कालावधी

होंडा Elevate SUV कार खरेदीसाठी ग्राहकांना 6 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते. जर तुम्हीही ही कार खरेदीसाठी इच्छुक असाल तर बुकिंग केल्यानंतर ६ महिन्यांनी ही कार तुम्हाला मिळू शकते. होंडाकडून त्यांची Elevate SUV कार एकूण चार मॉडेलमध्ये सादर केली आहे. SV, V VX आणि ZX अशा मॉडेल्समध्ये ही कार ऑफर करण्यात आली आहे.

होंडा Elevate किंमत

होंडा कार कंपनीकडून त्यांच्या Elevate एसयूव्ही कारची किंमत देखील कमी ठेवण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते. तर Elevate कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 16 लाख रुपयांपर्यंत जाते.

व्हेरियंटनुसार किंमती

Honda Elevate SV- एक्स शोरूम किंमत 10,99,900 रुपये

Honda Elevate V- एक्स शोरूम किंमत 12,10,900

Honda Elevate V- CVT एक्स शोरूम किंमत 13,20,900 रुपये

Honda Elevate VX – एक्स शोरूम किंमत 13,49,900

Honda Elevate VX- CVT एक्स शोरूम किंमत 14,59,900 रुपये

Honda Elevate ZX- एक्स शोरूम किंमत 14,89,900

Honda Elevate ZX CVT- एक्स शोरूम किंमत 15,99,900 रुपये

भारतीय बाजारपेठेत या वाहनांशी स्पर्धा आहे

होंडाची डॅशिंग एसयूव्ही Elevate कार Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Urban Cruiser Highrider, MG Astor, Kia Seltos, Volkswagen Taigun, Skoda Kushaq आणि आगामी Citroen C3 यांच्याशी स्पर्धा करते.

होंडा Elevate इंजिन

होंडाने त्यांच्या शक्तिशाली एसयूव्ही कारमध्ये 1.5-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 6,600 rpm वर 119 bhp पॉवर आणि 4,300 rpm वर 145 Nm टॉर्क जनरेट करते. कारचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.