Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda Elevate : Nexon आणि Creta च्या अडचणीत वाढ करणार होंडाची डॅशिंग SUV! देते 24 Kmpl मायलेज, किंमत फक्त…

होंडा कार उत्पादक कंपनीकडून भारतात ऑटो विस्तार मजबूत करण्यासाठी एसयूव्ही कार सादर करत आहे. अलीकडेच एक डॅशिंग एसयूव्ही कार सादर केली आहे जी Nexon आणि Creta च्या अडचणीत वाढ करू शकते.

0

Honda Elevate : देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही कारचा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे कार उत्पादक कंपन्या त्यांच्या शानदार एसयूव्ही कार सादर करत आहेत. ग्राहकांचा देखील नवीन एसयूव्ही कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी किमतीत जबरदस्त फीचर्स एसयूव्ही कार बाजारात सादर करण्यात आल्या आहेत.

टाटा मोटर्सने अलीकडे Nexon फेसलिफ्ट व्हेरियंट लॉन्च केले आहे तर ह्युंदाई कार निर्माती कंपनी त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही क्रेटा कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये भारतात लॉन्च करू शकते. मात्र सध्या Nexon आणि क्रेटा या दोन्ही एसयूव्ही कारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

होंडा कार कंपनीकडून अलीकडेच त्यांची डॅशिंग Elevate SUV लॉन्च केली आहे. तसेच या कारमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार मायलेजच्या बाबतीत देखील दमदार आहे. एकाच महिन्यात या कारची 5,685 युनिट्स विकली गेली आहेत. कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

होंडा Elevate एसयूव्ही कारच्या विक्रीमध्ये होत असलेली वाढ Nexon आणि Creta ची डोकेदुखी वाढवू शकते. या कारमध्ये शक्तिशाली इंजिन आणि आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

शक्तिशाली पेट्रोल इंजिन

होंडा कार कंपनीकडून त्यांच्या Elevate एसयूव्ही कारमध्ये Honda City कारसारखे इंजिन वापरले आहे. कारमध्ये 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे जे 119 bhp पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारचे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

Elevate कार उत्तम मायलेज देण्यास सक्षम

होंडा Elevate एसयूव्ही कार उत्तम मायलेज देण्यास सक्षम आहे. ही कार 17 Kmpl मायलेज देते तर काही परिस्थितींमध्ये Elevate एसयूव्ही कार 24 Kmpl मायलेज देते असा दावा देखील करण्यात आला आहे. कारची इंधन टाकी 40 लिटर क्षमतेची आहे.

Elevate वैशिष्ट्ये

होंडा Elevate कारमध्ये Android Auto, Apple CarPlay, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच सेमी-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर, सिंगल-पेन सनरूफ आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल अशी वैशिष्ट्ये दिली आहेत. तर कारमध्ये ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 11 लाख ते 16 लाख रुपये आहे.