Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda Elevate SUV : क्रेटाच्या किमतीत खरेदी करा ही आलिशान SUV ! मिळतात लक्झरी फीचर्स, त्वरित करा बुक

0

Honda Elevate SUV : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनके नवीन एसयूव्ही कार सादर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच एसयूव्ही सेगमेंटमधील कारची स्पर्धा देखील वाढली आहे.

होंडा कार उत्पादक कंपनीकडून क्रेटा एसयूव्ही कारशी टक्कर देण्यासाठी त्यांची Elevate एसयूव्ही कार लॉन्च करण्यात आली आहे. या कारला ग्राहकांची चांगली मागणी आहे. या कारची ऑक्टोबर 2023 मध्ये 4,957 युनिट्सची विक्री झाली आहे तर नोव्हेंबर 2023 मध्ये 4,755 युनिट्सची विक्री झाली आहे.

ह्युंदाई मोटर्सच्या क्रेटा एसयूव्ही कारपेक्षा होंडा Elevate एसयूव्ही कारमध्ये जबर्दस्त फीचर्स देण्यात आले आहेत. होंडा Elevate एसयूव्ही कार फीचर्सच्या बाबतीत क्रेटा एसयूव्ही कारच्या पुढे आहे.

Honda Eleavte वैशिष्ट्ये

आरामदायी स्टीयरिंग व्हील

होंडा Eleavte एसयूव्ही कारमध्ये प्रीमियम फीचर्स दिले आहेत. कारमध्ये टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग व्हील देण्यात आले आहे. त्यामुळे ड्राइव्हर त्याच्या सोयीनुसार स्टिअरिंग करू शकतो. त्यामुळे चालक आरामदायी ड्रायव्हिंग करू शकतो.

वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी

होंडाने त्यांच्या Eleavte एसयूव्ही कारमध्ये Apple आणि Android वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले आहे. हे फीचर्स क्रेटाच्या टॉप मॉडेलमध्येच उपलब्ध आहे. त्यामुळे होंडा Elevate एसयूव्ही कार तुमच्यासाठी एक उत्तम एसयूव्ही पर्याय आहे.

ADAS सुरक्षा फीचर्स

होंडाकडून Elevate एसयूव्ही कार ADAS सुरक्षा वैशिष्ट्यासह बाजारात सादर केली आहे. या फीचर्समध्ये कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टीम, रोड डिपार्चर मिटिगेशन सिस्टीम, लेन कीपिंग असिस्ट सिस्टीम, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटो हाय-बीम, लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन सिस्टीमचा समावेश आहे. क्रेटा कारच्या कोणत्याच व्हेरियंटमध्ये ADAS फीचर्स दिले नाही.

मोठा ग्राउंड क्लीयरन्स

होंडाने त्यांच्या Elevate एसयूव्ही कारला 220 मिमी ग्राउंड क्लीयरन्स दिला आहे. तर ह्युंदाईने त्यांच्या क्रेटा एसयूव्ही कारला 190 मिमी ग्राउंड क्लीयरन्स दिला आहे. क्रेटा एसयूव्ही कारमध्ये व्हॉईस ऑपरेटेड पॅनोरामिक सनरूफ देण्यात आले आहे जे Elevate एसयूव्ही कारमध्ये दिले नाही.

Honda Elevate इंजिन आणि किंमत

होंडा Elevate एसयूव्ही कारमध्ये फक्त 1.5-लीटर पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आला आहे. मात्र क्रेटा एसयूव्ही कारमध्ये 1.5-लीटर पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.

Elevate एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 16.28 लाख रुपये आहे. क्रेटा एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.87 लाख रुपये आहे. 5 हजार रुपयांची टोकं रक्कम भरून तुम्ही Elevate एसयूव्ही कार बुकिंग करू शकता.