Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

अवघ्या 10 लाखात जबरदस्त फीचर्स अन् मजबूत पॉवरट्रेनसह बाजारात येत आहे ‘ही’ डॅशिंग SUV कार। Honda Elevate

बेस्ट मायलेज तसेच मजबूत पॉवरट्रेन देखील कंपनीकडून ऑफर केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी Honda Elevate SV, V, VX आणि ZX या चार ट्रिममध्ये लॉन्च करू शकते. 

0

Honda Elevate: भारतीय बाजारपेठेमध्ये लोकप्रिय ऑटो कंपनी Honda Cars India येत्या काही दिवसात आपली बहुप्रतिक्षित कार Honda Elevate लाँच करणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेज तसेच मजबूत पॉवरट्रेन देखील कंपनीकडून ऑफर केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी Honda Elevate SV, V, VX आणि ZX या चार ट्रिममध्ये लॉन्च करू शकते.

आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने सध्या या कारसाठी बुकिंग देखील सुरु केली आहे. जर तुम्हाला ही कार बुकिंग करायची असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अवघ्या 21 हजारात ही कार बुक करू शकतात. चला मग जाणून घेऊया या कारबद्दल सविस्तर माहिती.

Honda Elevate (SV)

एलिव्हेटच्या बेस एसव्ही व्हेरियंटमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि एलईडी टेल-लॅम्प, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, ऑटोमॅटिक एसी, बेज फॅब्रिक अपहोल्स्ट्री, 16-इंच स्टील व्हील्स आणि ड्युअल-फ्रंट एअरबॅग्ज यांसारखी हाय-टेक फीचर्स पाहता  येईल.

Honda Elevate SUV
 

Honda Elevate (V)

यानंतर, कंपनी तुम्हाला या कारच्या V व्हेरियंटमध्ये चार स्पीकर, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्ससह 8.0-इंच टचस्क्रीन प्रदान करेल. त्याच वेळी, तुम्हाला त्यात CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील पाहायला मिळेल.

Honda Elevate (VX)

या नवीन व्हेरियंटमध्ये कंपनी अनेक फीचर्स देखील देऊ शकते. यात सिंगल-पेन सनरूफ, 17-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, रूफ रेल, 7.0-इंच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेन वॉच कॅमेरा, वायरलेस चार्जर, ऑटो फोल्डिंग विंग यांसारखी अधिक फीचर्स मिळतील. मिरर, एलईडी फॉग लॅम्प आणि 6 स्पीकर साउंड सिस्टीम देण्यात येणार आहे.

Honda Elevate इंजिन

कंपनी आपल्या आगामी कारमध्ये नॅचरली एस्पिरेटेड, चार-सिलेंडर, 1.5-लिटर पेट्रोल इंजिन देऊ शकते. हे इंजिन 121 HP कमाल पॉवर आणि 145 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा पर्यायी 7-स्टेप CVT गिअरबॉक्सशी जोडले जाईल.

Honda Elevate  किंमत

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या कंपनीने त्याच्या किमतींबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण असा अंदाज वर्तवला जात आहे की कंपनी 10 ते 12 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात लॉन्च करू शकते. यासोबतच ही कार मारुती सुझुकी ब्रेझा सारख्या वाहनांना थेट टक्कर देऊ शकेल. यामुळे जर तुम्ही नवीन एसयूव्ही कार खरेदीचा विचार करत असाल तर Honda Elevate तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकते.