Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda SP 125 Sports Edition : 11 हजार भरा आणि घरी आणा उत्कृष्ट Honda SP 125 बाईक, जाणून घ्या सविस्तर

बाईक खरेदी करायची आहे मात्र बजेट कमी पडतंय तर काळजी करू नका. तुम्ही आता अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये Honda SP 125 बाईक घरी आणू शकता.

0

Honda SP 125 Sports Edition : देशातील दुचाकी ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या बाईक्स उपलब्ध आहेत. या बाईक्सला चांगलीच मागणी आहे. मात्र काही ग्राहकांना कमी बजेटमुळे या बाईक्स खरेदी करता येत नाहीत. पण आता तुम्ही अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बाईक घरी आणू शकता.

तुमचेही बजेट कमी आहे आणि तुम्हालाही शानदार बाईक खरेदी करायची असेल तर Honda SP 125 Sports Edition बाईक उत्तम पर्याय आहे. ही बाईक तुम्ही ११ हजार रुपयांमध्ये घरी आणून बाईक खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकता. Honda SP 125 Sports Edition बाईकवर EMI पर्याय देण्यात येत आहे.

Honda SP 125 स्पोर्ट्स एडिशन किंमत

Honda SP 125 स्पोर्ट्स एडिशन बाईकची एक्स शोरूम किंमत 90,567 रुपये आहे. तर बाईकची ऑन रोड किंमत 1,04,943 रुपये आहे. बाईकची किंमत जरी जास्त असली तरी तुम्ही ही बाईक अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता.

Honda SP 125 स्पोर्ट्स एडिशन फायनान्स प्लॅन

बाईक खरेदी करण्यासाठी बजेट कमी असेल तर काळजी करू नका. Honda SP 125 स्पोर्ट्स एडिशन बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला १ लाख रुपयांची आवश्यकता आहे मात्र आता फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही Honda SP 125 स्पोर्ट्स एडिशन बाईक घरी आणू शकता.

जर तुम्ही Honda SP 125 स्पोर्ट्स एडिशन बाईक खरेदी करण्यासाठी ११ हजार रुपये भरले तर तुम्हाला बँकेकडून 93,943 रुपयांचे कर्ज घेऊ शकता. या कर्जावर तुमच्याकडून वार्षिक ९.७ टक्के व्याजदर आकारले जाईल.

बाईक घरी आणण्यासाठी तुम्हाला ११ हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरावे लागेल. त्यानंतर तुम्ही कर्ज घेऊन बाईक सहज घरी आणू शकता. कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दरमहा 3,018 रुपये EMI भरावा लागेल.

Honda SP 125 स्पोर्ट्स एडिशन इंजिन

Honda SP 125 स्पोर्ट्स एडिशन बाईकमध्ये 123.94cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 10.87 Ps पॉवर आणि 10.9 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकचे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. ही स्टायलिश बाईक 65 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.