Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Honda SUV ने केली Amaze आणि City कारची बत्ती गुल ! किंमत फक्त…

होंडा कार कंपनीकडून अलीकडेच त्यांची एक डॅशिंग एसयूव्ही कार सादर केली आहे. त्यांच्या या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

0

Honda Elevate SUV : होंडा कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो क्षेत्रातील विस्तार वाढवण्यासाटी त्यांच्या नवनवीन कार बाजारात सादर करत आहे. तसेच एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता होंडा देखील नवीन एसयूव्ही कार सादर करत आहे.

होंडा कार उत्पादक कंपनीने त्यांची Elevate एसयूव्ही कार सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Elevate एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

होंडा कार उत्पादक कंपनीने त्यांच्या कार विक्रीचा ऑक्टोबर २०२३ मधील अहवाल सादर केला आहे. यामध्ये होंडाची सर्वाधिक विक्री होणारी Elevate कार ठरली आहे. या कारची ऑक्टोबर २०२३ मध्ये 4,957 युनिट्सची विक्री झाली आहे. तर ही विक्री सप्टेंबरमध्ये 5,685 युनिट्सची विक्री झाली होती.

तर ह्युंदाईच्या सेडान कार Amaze ची ऑक्टोबर २०२३ मध्ये 2,890 युनिट्सची विक्री झाली आहे तर गेल्या वर्षी या कारची 5,443 युनिट्सशी विक्री झाली होती.

Honda Elevate ची किंमत

होंडा कार कंपनीकडून Elevate एसयूव्ही कारचे बेस मॉडेल 11 लाख रुपयांमध्ये सादर केली आहे. तसेच या कारचे टॉप मॉडेल 16 लाख रुपयांपर्यंत जाते. Elevate एसयूव्ही कार SV, V, VX आणि ZX या चार व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ही एसयूव्ही कार 16 ते 17 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

होंडा Elevate वैशिष्ट्ये

होंडा कार कंपनीकडून त्यांच्या Elevate एसयूव्ही कारमध्ये 10.25-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ADAS-आधारित ड्रायव्हर-असिस्ट, 8-स्पीकर, सहा एअरबॅग्ज आणि सुरक्षा तंत्रज्ञानाचा Honda Sensing संच अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, 16-इंच स्टील व्हील, एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स, एलईडी टेललाइट्स, पुश-बटण इंजिन स्टार्ट/स्टॉप, ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग सिस्टम, बेज फॅब्रिक अपहोल्स्ट्री असे फीचर्स दिले गेले आहेत.

होंडा Elevate इंजिन

होंडा कार कंपनीने त्यांच्या Elevate एसयूव्ही कारमध्ये 1.5-लीटर चार-सिलेंडर VTEC पेट्रोल इंजिन दिले आहे जे 121 PS पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करण्यास मदत करते. कारचे हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. Elevate कार एकूण 10 रंग पर्यायांमध्ये सादर केली आहे. यामध्ये 7 सिंगल आणि 3 ड्युअल टोन रंगांचा समावेश आहे.