Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hybrids Cars In India : टोयोटा Hyryder ते Grand Vitara, या आहेत देशातील 5 स्वस्त हायब्रीड कार, पेट्रोल आणि बॅटरीवरही चालतात…

भारतीय ऑटो बाजारात नवीन तंत्रज्ञानावर आधारित अनेक कंपन्यांनी स्वस्त हायब्रीड कार सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

0

Hybrids Cars In India : भारतीय ऑटो बाजारात दिवसेंदिवस अनेक प्रगत फीचर्स असलेल्या कार सादर केल्या जात आहेत. या कार अनेक नवीन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. सध्या इलेक्ट्रिक कारचा ट्रेंड सुरु असला तरी पेट्रोल आणि बॅटरीवर चालणाऱ्या हायब्रीड कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांकडून त्यांच्या लक्झरी फीचर्स असलेल्या हायब्रीड कार सादर केल्या आहेत. या कार मायलेजच्या बाबतीत देखील इतर कारच्या पुढे आहेत. या कार बॅटरी आणि पेट्रोलवर देखील चालतात.

भारतातील खालील हायब्रीड कार सर्वात स्वस्त आहेत

Toyota Urban Cruiser Hyryder

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या हायब्रीड सेगमेंटमध्ये अनेक कार सादर केल्या आहेत. सध्या टोयोटाचे हायब्रीड कार सेगमेंटमध्ये वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील Toyota Urban Cruiser Hyryder ही हायब्रीड कार स्वस्त आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 16.46 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे. ही हायब्रीड कार 27.97kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी Grand Vitara

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीने टोयोटा हायराइडर कारवर आधारित ग्रँड विटारा कार सादर केली आहे. या कारची किंमत टोयोटा हायराइडर कारपेक्षा जास्त आहे. Grand Vitara कारची सूर्यवतीची एक्स शोरूम किंमत 18.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.79 लाख रुपये आहे. ही कार 27.97kmpl पर्यंत मायलेज देते.

Honda City e:HEV

होंडा कार कंपनीकडून देखील त्यांची स्वस्त हायब्रीड कार सादर केली आहे. City e:HEV ही कार हायब्रीड व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. देशातील ही एक सर्वात स्वस्त सेडान कार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 18.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20.49 लाख रुपये आहे. होंडा सिटी हायब्रीड कार 27.13kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी इनव्हिक्टो

मारुती सुझुकीची आणखी एक इनव्हिक्टो कार हायब्रीड व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. या ही कर टोयोटा इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड कारवर आधारित आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 24.79 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 28.42 लाख रुपये आहे. ही कार 23.24 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस कार हायब्रीड व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. या कारची सुरवातीची एक्स शोरूम किंमत 25.30 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 30.26 लाख रुपये आहे.ही हायब्रीड कार 23.24kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.